क्राईम न्यूज

Maharashtra FDA Raid : Zepto च्या गोदामात सडलेले अन्न व घाण – FDA कडून परवाना रद्द

Maharashtra FDA Raid On Zepto : खाद्य सुरक्षा कायद्याचे गंभीर उल्लंघन,फंगस लागलेले खाद्यपदार्थ, ओल्या जमिनीवर ठेवलेला साठा; ग्राहकांच्या आरोग्याला धोका

मुंबई | झेप्टो या क्विक-कॉमर्स सेवा पुरवणाऱ्या कंपनीला महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) कडून मोठा दणका बसला आहे. Maharashtra FDA Raid On Zepto धारावीतील झेप्टोच्या फूड वेअरहाऊसवर अचानक केलेल्या तपासणीत सडलेले, फफूंदी लागलेले अन्नपदार्थ आढळून आले. या प्रकरणात गंभीर अस्वच्छता, साठवणुकीतील नियमभंग आणि अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्याने कंपनीचा अन्न परवाना तात्काळ रद्द करण्यात आला आहे.

FDA अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेअरहाऊसमध्ये जमीन ओलसर आणि घाणेरडी स्थितीत होती. अन्नपदार्थ थेट जमिनीवर, पाण्याजवळ साठवले गेले होते. कोल्ड स्टोरेजचे तापमान देखील नियमांनुसार ठेवले गेले नव्हते. काही उत्पादनांवर फफूंदी स्पष्टपणे दिसून येत होती, ज्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. विशेष म्हणजे, एक्सपायरी झालेली उत्पादने सामान्य साठ्यात मिसळून ठेवली गेली होती, त्यामुळे ती थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा धोका होता.

FDA च्या सहाय्यक आयुक्त अनुपमा पाटील यांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 मधील कलम 32(3) आणि 2011 च्या परवाना नियमावलीतील कलम 2.1.8(4) अंतर्गत झेप्टोचा परवाना निलंबित केला. त्यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत कंपनी सर्व त्रुटी दूर करत नाही आणि नियामक संस्थेकडून परवानगी मिळत नाही, तोपर्यंत धारावीतील अन्न व्यवसाय थांबलेलाच राहणार आहे.


vivek

Recent Posts