Maharashtra Election Commission Latest News : विरोधकांचे आक्षेप झुगारून नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुका जाहीर; दुबार मतदारांसाठी खास ‘टूल’ विकसित
मुंबई :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं असून, राज्य निवडणूक आयोगाने आज (4 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन 246 नगपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुकीची घोषणा केली. यात 15 नव्या नगरपंचायतींचा समावेश आहे. मात्र, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच महाविकास आघाडी (मविआ) आणि मनसेने मतदार यादीत मोठा घोळ असल्याचा आरोप करत, याद्या स्वच्छ होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी केली होती.
विरोधकांच्या याच आक्षेपाला झुगारून आयोगाने निवडणुका जाहीर केल्या असल्या तरी, दुबार मतदारांचा घोळ मिटवण्यासाठी आयोगाने खास उपाययोजना केली आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टिमवर एक विशेष ‘टूल’ विकसित केले आहे. या टूलच्या मदतीने प्रत्येक नगरपरिषद आणि नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य दुबार मतदाराच्या नावापुढे ‘डबल स्टार’ दिसेल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
ज्या मतदाराच्या नावापुढे ‘डबल स्टार’ आलेला आहे, त्या ठिकाणी संबंधित अधिकारी प्रभागात जाऊन तो मतदार नक्की कुठे मतदान करेल, याची माहिती घेतील. या मतदाराचे नाव, लिंग, फोटो, पत्ता या सर्व बाबींची तपासणी केली जाईल. ज्या मतदान केंद्रामध्ये दुबार मतदाराला मतदान करायचे आहे, त्याच मतदान केंद्रावर त्याला मतदान करण्याची सोय असेल आणि अन्य कोणत्याही मतदान केंद्रावर त्याला मतदान करता येणार नाही.
ज्या मतदाराच्या नावापुढे ‘डबल स्टार’ आलेला आहे आणि त्याने आयोगाला कोणताही प्रतिसाद दिला नाही, तर सर्व मतदान केंद्रांवर त्याच्या नावापुढे डबल स्टार दाखवला जाईल. असा मतदार मतदान केंद्रावर आल्यास, त्याच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाईल. ‘मी या मतदान केंद्राव्यतिरिक्त इतर मतदान केंद्रावर मतदान केलेले नाही, तसेच अन्य मतदान केंद्रावरही मतदान करणार नाही,’ असे मतदाराकडून लिहून घेतले जाईल.
दुबार मतदारांच्या घोळासोबतच मतदारांच्या सोयीसाठीही आयोगाने विशेष व्यवस्था केली आहे. आयोगाने मतदारांसाठी एक विशेष संकेतस्थळ आणि मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या मदतीने मतदारांना त्यांचे मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्राचा शोध घेता येईल. एवढेच नाही, तर उमेदवार कोण आहे, त्यांच्या विरोधात किती गुन्हे दाखल आहेत, याची माहितीही मतदारांना या ॲपवर उपलब्ध होणार आहे.
आयोगाच्या या नव्या ‘डबल स्टार’ प्रणालीमुळे मतदार यादीतील घोळ किती प्रमाणात दूर होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…