Kalyan Breaking News : रुग्णालयाच्या स्वागत कक्षातच हाणामारी! स्वागतिकेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

Kalyan Latest Crime News : डॉक्टरी पेशातील महिला कर्मचाऱ्यांवर हल्ला; रुग्ण व नातेवाईकांनी वाचवले प्राण
कल्याण | कल्याण पूर्वेतील नांदिवली गावातल्या श्री बाल चिकित्सालयात सोमवारी संध्याकाळी घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. रुग्णालयाच्या स्वागत कक्षात तरुणीवर एक तरुण अचानक तुफान हल्ला चढवला. या तरुणाने स्वागतिकेच्या छातीवर लाथ मारून तिचे केस पकडत उचलआपट केली. या प्रकारामुळे परिसरात गोंधळ उडाला. Kalyan Latest Crime News
रुग्ण, नातेवाईकांनी प्रसंगावधान राखत तिला त्या तरुणाच्या तावडीतून सोडवले. या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून, आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता डॉ. अनिकेत पालांडे रुग्णालयात आले. औषध विक्रेते (एमआर) डॉक्टरांशी बैठक करत असतानाच, रुग्ण अनन्या झा आणि तिच्यासोबत असलेला गोकुळ झा या तरुणाने डॉक्टरांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न केला.
स्वागतिकेने – “डॉक्टर मोकळे झाल्यावर आत सोडतो” असे सांगत त्यांना थांबण्यास सांगितले. याच कारणावरून गोकुळ झा भडकला आणि स्वागतिकेवर अश्लील शिवीगाळ करत तिला जोरदार लाथ मारली. नंतर केस ओढून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला.
या घटनेनंतर पीडित तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गोकुळ झाविरुद्ध मारहाण, विनयभंग आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.
रुग्णालयाच्या कॅमेऱ्यातही हल्ल्याचे दृश्य कैद झाले असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी गोकुळ झाला तातडीने अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी डॉक्टर, कर्मचारी आणि नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.


