Maharashtra Election 2024 : मनसेच्या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांना आमंत्रण!
Maharashtra Election 2024 : मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी विक्रोळीतील सभेसाठी संजय राऊत यांना आमंत्रण दिले आहे. तसेच, सभामध्ये संजय राऊत याच्यासाठी एक खुर्ची खाली ठेवणार असल्याचे म्हटले आहे
मुंबई :- विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यावरील आरोप प्रत्यारोपाचे मालिका दिवसा दिवस वाढतच आहे. काही दिवसापूर्वीच विक्रोळी मध्ये मनसेने जाहीर सभा घेतली होती आज पुन्हा विक्रोळी विधानसभाकरिता भांडुप Bhandup Vidhan Sabha Election मध्ये मनसे कडून सभा घेण्यात येणार आहे. सर्जेराव त्यांनी राज ठाकरेंच्या या सभेवर काल टीका केली त्याला प्रत्युत्तर म्हणून राज ठाकरे यांची विक्रोळीमध्ये सभा होत आहे. या सभेला मनसेकडून संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आले आहे. सभेत संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवण्यात येणार आहे. संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवण्यात येणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी दिली आहे. या नवीन प्रकारामुळे मुंबईसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर सडकून टीका सुरू असताना मनसेच्या मंचावर संजय राऊत कसे येतील आणि का येतील असा प्रश्न विचारण्यात येत आहे. तर दुसरीकडे मनसेने संजय राऊत यांना का निमंत्रण दिले आहे. अर्थात याला या वादाचीच किनार आहे.
मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांचे निमंत्रण!
संजय राऊत यांच्या मेंदूला गंज लागलाय ते काहीही बोलतात. त्यामुळे राजकीय नेत्याने कसे बोलावे हे ऐकण्यासाठी त्यांना विक्रोळी येथे होणाऱ्या मनसेच्या सभेला निमंत्रण धाडण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. राजकीय विचार कसे असावेत व विचारांची देवाण घेवाण कशी असावी या यासाठी त्यांना सभेला बोलावण्यात आल्याचा चिमटा मनोज चव्हाण Manoj Chavhan यांनी काढला.
संजय राऊत काय म्हणाले?
राज ठाकरे काय म्हणतात याला महाराष्ट्रात किंमत नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भान ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले होते. त्यानंतर हा वाद आता पेटला आहे. राज ठाकरे यांनी भाजपाला अनुकूल भूमिका घेतल्यापासून महाविकास आघाडीतून त्यांच्यावर तोफगोळे डागण्यात येत आहेत. आता मनसेने त्यांना सभेचे निमंत्रण देऊन मोठी खेळी खेळली आहे.