Kalyan Sex Racket : कल्याणमध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड; महिला एजंट अटकेत, दोन अल्पवयीन मुलींची सुटका

Kalyan Latest Sex Racket Busted News : ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवून गूगल पे ने पैसे घेऊन देहव्यापाराचा गोरखधंदा
कल्याण | कल्याण शहरातील महात्मा फुले चौक परिसरात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश Kalyan Sex Racket करत ठाणे शहर क्राइम ब्रँचच्या Thane Crime Beanch अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक (AHTC) शाखेने मोठी कारवाई केली आहे. एका महिला एजंटला रंगेहाथ पकडून तिला अटक करण्यात आली आहे, तर दोन पीडित मुलींना या नरकयातनेतून बाहेर काढण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. Thane Latest Crime News
AHTC शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना गुप्त माहिती मिळाली होती की, दीक्षा हॉटेल (कल्याण रेल्वे स्थानकासमोर) परिसरात एक महिला एजंट ग्राहकांना मुली पुरवते. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला एजंट ग्राहकांना व्हाट्सअॅपद्वारे मुलींचे फोटो पाठवून त्यांच्याकडून ऑनलाईन व्यवहाराद्वारे (Google Pay इत्यादी) पैसे घेत होती आणि ठराविक ठिकाणी मुली पोहोचवत होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून पथकासह सापळा रचला. दीक्षा हॉटेलजवळ एजंट ग्राहकाशी डील करताना सापळ्यात अडकली आणि तिच्यावर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान दोन तरुणींची सुटका करण्यात आली, ज्या या अनैतिक धंद्याच्या दलदलीत जबरदस्तीने ढकलण्यात आल्या होत्या.
अटक करण्यात आलेली महिला एजंट हा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर चालवत होती. ती फक्त दलालच नव्हती तर आपल्या नेटवर्कद्वारे अनेक मुलींना या व्यवसायात ओढून घेत होती. क्राइम ब्रँच आता या रॅकेटच्या मूळ मुळाशी जाण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढवत असून, आरोपीचे आणखी किती साथीदार आहेत, याचा शोध घेत आहे.
पीडित मुलींना तत्काळ ताब्यात घेऊन त्यांना न्याय मिळावा म्हणून सुरक्षित महिला सुधारगृहात हलविण्यात आले आहे. आरोपी महिलेविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली व PITA (Prevention of Immoral Traffic Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशस्वी कारवाई ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली AHTC शाखेच्या सीनियर PI चेतना चौधरी, PSI स्नेहल शिंदे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे कल्याण शहरात अनैतिक मानवी वाहतुकीविरोधात एक सकारात्मक संदेश गेला असून पुढील कारवायांसाठी पोलिसांची रणनीती अधिक आक्रमक असणार आहे.



