मुंबई

Maharashtra Cabinet News : राज्य मंत्रिमंडळात फेरबदलांची चर्चा तेजीत: राऊतांच्या गौप्यस्फोटाने खळबळ; बांगर यांना आरोग्यमंत्री होण्याची इच्छा!

Maharashtra Cabinet Latest News : कृषीमंत्री कोकाटे यांच्यावरील आरोपांवरून बांगर यांची पाठराखण; ‘तो व्हिडीओ क्रॉप केलेला’ असल्याचा दावा

मुंबई: राज्यात महायुतीमधील काही मंत्र्यांमध्ये खांदेपालट होणार असून, काहींची ‘विकेट’ पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी ‘सामना’मधून याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केल्याने मंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा अधिकच रंगली आहे. विशेष म्हणजे, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे Manikrao Kokate यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि कृतीमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असतानाच, हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी मात्र माणिकराव कोकाटे यांचे कौतुक केले आहे. यासोबतच, मंत्री होण्यासाठी आपण इच्छुक असून, आरोग्य विभागाचा मंत्री म्हणून काम करायला आवडेल, अशी इच्छाही आमदार बांगर यांनी व्यक्त केली आहे. Maharashtra Cabinet Latest

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेतले जाईल, तसेच त्यांचा राजीनामा देखील होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या संदर्भात विचारले असता, आमदार बांगर यांनी कोकाटे यांची पाठराखण केली. “माणिकराव कोकाटे रमी खेळत नव्हते, त्यांचा व्हिडिओ क्रॉप केलेला आहे. अलिकडच्या काळात कुणीही काहीही क्रॉप करून बनवत आहेत. माणिकराव कोकाटे सर्वात चांगला मंत्री आहे,” असे आमदार बांगर यांनी म्हटले. त्यांनी स्पष्ट केले की, माणिकराव कोकाटे यांनी रमी वगैरे काही खेळलेली नाही आणि तो व्हिडिओ क्रॉप केलेला आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून कोणीही काहीही क्रॉप करून दाखवत असल्याचे ते म्हणाले.

आजपासून श्रावण मासारंभास सुरुवात झाली असून, 4 ऑगस्ट रोजी आमदार संतोष बांगर यांची कावड यात्रा निघणार आहे. या अनुषंगाने त्यांनी एबीपी माझासोबत संवाद साधला. यावेळी बोलताना बांगर यांनी सांगितले की, “ही भोलेनाथाची कावड असते, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे या कावड यात्रेला संबोधित करण्यासाठी येणार आहेत.” स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना बांगर म्हणाले की, “शिवसैनिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनी-टाईम तयार असतात. त्यामुळे शिंदे साहेबांचा आदेश आमच्यासाठी शिरोधार्य असतो. निवडणुकीचे रणशिंग फुंकलेलेच आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा ध्वज आम्ही फडकवणार आहोत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago