Maharashtra Cabinet Meeting : आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले
Maharashtra Government Cabinet Meeting Decision : मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अनेक निर्णय घेण्यात आले.
मुंबई :- लोकसभा आचारसंहिता Lok Sabha Code of Conduct आज पासून लागणार आहे त्यापूर्वीच राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहे. एकाच हप्त्यामध्ये तीन वेळा कॅबिनेट बैठक होऊन शासनाचे प्रलंबित विषय मार्गी लावण्याचे काम शासनाकडून करण्यात आले आहे. पुढील दोन ते तीन महिने राज्य सरकारला कोणत्याही प्रकारे विकास कामाची घोषणा अथवा नवीन प्रकल्पाचे माहिती देता येणार नाही. तत्पूर्वी शिंदे सरकारने आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनेक कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णय (Maharashtra Government Cabinet Meeting Decision)
1.राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी.
2.तात्पुरत्या स्वरूपातील 64 वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार.
3.मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला.
4.138 जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.
5.संस्कृत, तेलुगू, बंगाली, गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापणार.
9.शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण.
10.विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. 50 कोटी भागभांडवल.
11.पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.
12.हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली ‘मॅनहोलकडून मशीनहोल’ कडे योजना.
13.संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार.
14.राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार.
15.ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. ५० कोटी अनुदान.
16.भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप.
17.संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार.
18.वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन.
19.राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी 20 कोटी अतिरिक्त निधी मंजूर.
21.श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित.