महाराष्ट्र
Trending

Maharashtra Cabinet Meeting : एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाचा धडाका

Maharashtra Cabinet Meeting : मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक धडाकेबाज निर्णय घेण्यात आले आहे. राज्यात 104 आयटीआय संस्थाचे नामकरण करणार अनेक समाजांचे महामंडळ स्थापन करणार

मुंबई :- राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज धडाकेबाज निर्णय घेण्यात आले आहे. आज झालेल्या बैठकीत तब्बल 34 धडाकेबाज निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. Maharashtra Cabinet Meeting मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील आणखी 104 आयटीआय संस्थेचे नामकरण करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

बारी,तेली, हिंदू खाटीक,लोणारी समाजासाठी आर्थिक महामंडळाची स्थापनेची घोषणा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली आहे. बौद्ध समाजातील सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांना 10 लाख रुपये पर्यंत अनुदान देण्याची योजना सरकारने राबिवली आहे.

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय

  • राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ
  • महसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणार
  • दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह नाट्यगृहासाठी शासकीय जमीन
  • त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास गती देणार
  • टेंभू उपसा सिंचन योजनेस स्व अनिल भाऊ बाबर यांचे नाव
  • पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना गती देणार; सिल्लोड मधील जमिनीला सिंचन
  • प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षाचा तुरुंगवास, एक लाख दंडाची तरतूद
  • राज्यातील खेळाडूंसाठीच्या पारितोषिकांचा रकमेत वाढ
  • राज्यातील आणखी 104 आयटीआय संस्थांचे नामकरण
  • संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवणार
  • लहान जलविद्युत प्रकल्पासाठी बांधा वापरा हस्तांतरण धोरण
  • कोकण पुणे विभागासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन कंपन्या
  • महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना
  • राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र
  • जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ
  • महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ
  • आजरा तालुक्यातील वेळवट्टी, गवसे, घाटकरवाडी बंदिस्त पाईपलाईन टाकणार
  • बंजारा, लमाण तांड्यात ग्रामपंचायतसाठी लोकसंख्येची अट शिथिल
  • कागल येथील सागावमध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय
  • महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार
  • कुडाळ तालुक्यातील डोंगरेवाडीत साठवण तलाव
  • बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे
  • गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार; २६०४ कोटीस मान्यता
  • राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करणार. १ लाख ६० हजार कोटींचे गुंतवणूक अपेक्षित
  • उच्च तंत्रज्ञानावर आधारित अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणा; अधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहन
  • राळेगण सिद्धी येथील उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण
  • शिरोळ तालुक्यातील गावांमध्ये भूमिगत चर योजना राबवणार
  • बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजना
  • सोलापूर ते मुंबई हवाई मार्गासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग देणार
  • वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायरोध भत्ता देणार
  • डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्र मधील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना
  • वडाळा सॉल्ट पॅनमधील भूखंड शैक्षणिक कारणांसाठी
  • रमाई आवास, शबरी आवास योजनेतील घरकूल अनुदानात वाढ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0