Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळात सरकारने 19 धडाकेबाज निर्णय घेत विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील जनतेला सरकारकडून खास गिफ्ट
मुंबई :- राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे Vidhan Sabha Election बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकते. आचारसंहिता लागण्याकरिता अतिशय कमी कालावधी असताना सरकार तत्पूर्वीच निर्णयाचा भडीमार करत आहे. राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत Maharashtra Cabinet Meeting मुंबईकरांना दिवाळीपूर्वीच गिफ्ट दिले आहे. मुंबईतील सर्व टोल नाका लहान वाहनां करिता टोल मुक्त झाले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कौशल्य विद्यापीठात रतन टाटा यांचे नाव देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आले आहेत. 19 धडाकेबाज निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहे.
1.मुंबईतल्या 5 प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ 12 वाजेपासून अंमलबजावणी.
2.आगरी समाजासाठी महामंडळ
3.समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम
4.दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता
5.आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता
6.वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता
7.राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित
8.पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी
9.खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य
10.राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) 2.0 राबविणार
11.पुणे मेट्रो रेल टप्पा-2 मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता
12.किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ
13.अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ
14.मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची 3 पदे
15.खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना
16.मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा
17.अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट
18.‘उमेद’साठी अभ्यासगट
19.कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…