Maharashtra cabinet Meeting : मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, नवी मुंबईत परदेशी नागरिकांसाठी डिटेन्शन सेंटर उघडणार
Maharashtra cabinet Meeting : मंत्रिमंडळाच्या बैठकीत विहित मुदतीपेक्षा जास्त कालावधीत राहणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी नवी मुंबईत कायमस्वरूपी अटकाव केंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
मुंबई :- बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांची Illegal Migrant बंदिस्त गृह बांधणार. या लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आता सतर्क झाले आहे. एकनाथ शिंदे सरकारने CM Eknath Shinde शुक्रवारी (5 जुलै) नवी मुंबईत परदेशी नागरिकांसाठी कायमस्वरूपी डिटेन्शन सेंटर सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. नवी मुंबईतील बालेगाव येथे कायमस्वरूपी बंदीगृह बांधले जाईल, तर मुंबईतील भोईवाडा मध्यवर्ती कारागृहात तात्पुरते बंदीगृह बांधले जाईल, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.
नवी मुंबई केंद्रात 213 कैदी राहतील, तर भोईवाडा केंद्रात एकावेळी 80 लोकांना राहण्याची क्षमता असेल. अधिका-याने सांगितले की अशा केंद्रांची गरज भासली कारण अनेक प्रकरणांमध्ये, व्हिसाच्या कालावधीपेक्षा जास्त काळ भारतात राहिल्यामुळे तुरुंगवास भोगल्यानंतर सुटलेले परदेशी नागरिक विविध कारणांमुळे त्वरित त्यांच्या देशात परत जाऊ शकत नाहीत.