Maharashtra Cabinet Expansion News: मंत्रिमंडळ विस्तार भाजपच्या 19, राष्ट्रवादीच्या 9 आणि शिवसेनेच्या 11 आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ!
Maharashtra Cabinet Expansion News: नागपुरात झालेल्या समारंभात मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. भाजप, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 39 आमदारांना मंत्री करण्यात आले.
नागपूर :- रविवारी (15 डिसेंबर) मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. Maharashtra Cabinet Expansion News नागपुरात झालेल्या समारंभात नव्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.महायुतीतील तीन घटक पक्षांच्या एकूण 39 आमदारांना मंत्री करण्यात आले आहे. भाजपच्या 19 आमदारांनी, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या 11 आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी अनेक ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. रविवारी 39 मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या 42 झाली आहे.
भाजपचे हे आमदार झाले मंत्री?
चंद्रशेखर बावनकुळे
राधाकृष्णविखे पाटील
चंद्रकात पाटील
गिरीश महाजन
गणेश नाईक
मंगल प्रताप लोढा
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
अतुल सावे
अशोक उईके
आशिष शेलार
शिवेंद्रराजे भोसले
जयकुमार गोरे
संजय सावकारे
नितेश राणे
आकाश पुंडकर
माधुरी मिसाळ
पंकज भोयर
मेघना बोर्डीनकर
शिवसेनेतून कोण मंत्री झाले?
गुलाबराव पाटील
दादा भुसे
संजय राठोड
उदय सावंत
शंभूराज देसाई
संजय शिरसाट
प्रताप सरनाईक
भरत गोगवाले
आशिष जैस्वाल
योगेश कदम
राष्ट्रवादीचे कोण-कोण आमदार मंत्री झाले?
हसन मुश्रीफ
धनंजय मुंडे
दत्तात्रेय भरणे
आदिती तटकरे
माणिकराव कोकाटे
नरहरी झिरवाळ
मकरंद पाटील
बाळासाहेब पाटील
इंद्रनील नाईक
तत्पूर्वी, 5 डिसेंबर रोजी मुंबईत एका भव्य समारंभात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या काळात शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.16 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या आठवडाभर चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी रविवारी भाजपच्या नेतृत्वाखालील देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला.