•सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच सभागृहात | चहापानावर बहिष्कार टाकत महाविकास आघाडी आक्रमक
मुंबई :- महाराष्ट्र विधिमंडळाच्या बहुप्रतीक्षित अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून वादळी वातावरणात सुरुवात होत आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील धक्कादायक निधनानंतरचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने राजकीय वर्तुळात मोठी संवेदनशीलता पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारलेल्या सुनेत्रा पवार यांच्या कार्यकाळातील हे पहिलेच अधिवेशन असल्याने, सभागृहात त्या कशा प्रकारे सरकारची बाजू मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या पारंपारिक चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला आहे. अजित पवार अपघात प्रकरणातील संशयास्पद बाबी, राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे हे अधिवेशन अत्यंत संघर्षाचे आणि वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.
अधिवेशनाचे आजचे वेळापत्रक:
अधिवेशनाची सुरुवात सकाळी 11 वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांची (विधानसभा आणि विधानपरिषद) संयुक्त बैठक पार पडणार असून राज्यपाल सरकारची आगामी धोरणे मांडतील. अभिभाषण संपल्यानंतर 20 मिनिटांची विश्रांती दिली जाईल आणि त्यानंतर विधानसभेच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होईल.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…