Maharashtra Budget Session 2025: महायुती सरकारचे सोमवारपासून (3 मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशन!

Maharashtra Budget Session 2025: विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता, 3 मार्च ते 26 मार्च या कालावधीत अधिवेशनचे कामकाज चालणार
मुंबई :- राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर चे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी 3 मार्चपासून मुंबईच्या विधिमंडळात सुरू होणार आहे. 3 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे. तसेच, विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात 10 मार्च रोजी राज्याच्या अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून, अर्थसंकल्प अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची दाट शक्यता आहे. त्याच बरोबर मंत्र्यांवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप ही सरकारला त्रासदायक ठरत आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत शनिवार 8 मार्च सार्वजनिक सुटीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहाणार आहे. तर 13 मार्च होळीनिमित्त कामकाजास सुटी देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतरचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या अधिवेशनाकडे लागले आहे. निवडणुकी आधी सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. या शिवाय अनेक योजनांची घोषणा केली. त्यामुळे त्याचा थेट ताण राज्याच्या तिजोरीवर पडला होता.
सरकारला विरोधक या अधिवेशनात घेरण्याची दाट शक्यता आहे. त्याच बरोबर मंत्र्यांवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप ही सरकारला त्रासदायक ठरत आहे. धनंजय मुंडे हे विरोधकांच्या रडारवर असतील. त्याच बरोबर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपदही धोक्यात आहे. त्यांना शिक्षा होवून ही त्यांची आमदारकी रद्द करण्यात आलेली नाही. त्यामुळे विरोधक आक्रमक होतील हे नक्की आहे. तानाजी सावंत यांचा ही मुद्दा विरोधकांच्या हातात आहे. शिवाय महायुतीत सुरू असलेली अंतर्गत कुरबूरीवरून विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची शक्यता आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील राजकीय हस्तक्षेप या सर्वांचा या अधिवेशनावर चांगलाच परिणाम होणार आहे. तसेच विरोधकांकडून विरोधी पक्ष नेत्याचे नाव पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीला ठाकरे गडाकडं आमदारांची संख्या इतर पक्षांच्या तुलनेत अधिक असल्याने ठाकरे गट विरोधी पक्षासाठी दावा करणार आहे. तर ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, भास्कर जाधव यांचे नाव आघाडीवर असल्याचे म्हटले जात आहे. तसेच उद्या होणाऱ्या चहा पाण्याच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून बहिष्कार टाकल्या जाणार असल्याचे चर्चा आहे. अधिवेशनाच्या पूर्वी सरकार आणि विरोधकांकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.