मुंबई

Maharashtra Budget 2024: अधिवेशनात महिलांना विविध योजनेचा पाऊस

Maharashtra Government Budget 2024: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तसेच त्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या आत असलेल्या मुलींना उच्च शिक्षणासाठी तरतूद

मुंबई :- राज्याचे पावसाळी Maharashtra Monsoon Session अधिवेशन चालू आहे हे राज्य सरकारचे शेवटचे अधिवेशन असून तत्पूर्वी अतिरिक्त अर्थसंकल्प अधिवेशन राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मांडला आहे. यामध्ये शेतकऱ्यासह महिलांसाठी विविध योजना सरकारने घोषित केले आहे. (Maharashtra Budget 2024)  मुलींच्या शिक्षणाबाबत राज्य सरकारने योजना घोषित केले आहे अटला का खालील वार्षिक उत्पन्न असलेल्या आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल अशा घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क मध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच लाडकी बहीण योजना अंतर्गत जवळपास 46 हजार कोटीची तरतूद राज्य सरकारने केली आहे.

महिलांसाठी विविध योजना

  • मुलींना मोफत उच्च शिक्षण- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित ८ लाख रूपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के प्रतिपूर्ती
  • महिला लघुउद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना- अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात आयोजन
  • आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लघुउद्योजकांना १५ लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा – १० हजार रोजगार निर्मिती
  • लखपती दिदी- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ७ लाख नवीन गटांची स्थापना-बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत १५ हजार रुपयांवरुन ३० हजार रुपये वाढ
  • महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेद मार्ट आणि ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म याद्वारे आतापर्यंत १५ लाख महिला लखपती दिदी, या वर्षात २५ लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट
  • जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील १ कोटी २५ लाख ६६ हजार ९८६ घरांना नळजोडणी पूर्ण- राहिलेल्या २१ लाख ४ हजार ९३२ घरांसाठीचे काम प्रगतीपथावर
  • मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना- वर्षाला घरटी तीन गॅस सिलेंडर मोफत देणार- ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना लाभ
  • शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह” योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान १० हजार रुपयांवरून २५ हजार रुपये
  • राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी ७८ कोटी रुपये
  • रुग्णांची विशेषतः गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने- आण करण्यासाठी ३ हजार ३२४ रुग्णवाहिका
  • दिनांक १ मे, २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्याचे नांव, आईचे नांव, वडिलांचे नांव व आडनांव या क्रमाने करण्याचे बंधनकारक
  • पिंक ई रिक्षा – १७ शहरांतल्या १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य – – ८० कोटी रुपयांचा निधी
  • सन २०२३-२४ पासून लेक लाडकी योजनेची सुरुवात – मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्याटप्याने एकूण एक लाख एक हजार रुपये
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – २१ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दरवर्षी सुमारे ४६ हजार कोटी रुपये निधी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0