Maharashtra Election Latest Update : राज्य निवडणूक आयोगाकडून तारखांची घोषणा; राज्यात तत्काळ आचारसंहिता लागू; 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरणार
मुंबई :- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रतीक्षा अखेर संपली आहे! राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) आज पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह (BMC) राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, प्रलंबित असलेल्या या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आणि 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेमुळे राज्यात तत्काळ आचारसंहिता लागू झाली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आणि महत्त्वपूर्ण माहिती दिली: Maharashtra State Election Latest News
निवडणुकांचा कार्यक्रम:
मतदान: 15 जानेवारी 2026
मतमोजणी: 16 जानेवारी 2026
मतदार यादी आणि प्रभाग पद्धत
मतदार यादी : निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरली जाईल.
दुबार नावे: मतदार यादीत दुबार नावे असलेल्या मतदारांच्या नावापुढे ‘डबल स्टार’ (**) चिन्ह असेल. अशा मतदारांना कोणत्याही एकाच मतदान केंद्रावर मतदान करता येईल. आयोगाकडून संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन पाहणी केली जाणार आहे.
मतदान केंद्र: केवळ मुंबई महापालिकेत (BMC) 10,111 मतदान केंद्र असतील.
मतदानाची पद्धत (प्रभागानुसार):
बृहन्मुंबई महापालिका: मुंबईत 1 सदस्यीय प्रभाग पद्धत असल्यामुळे येथील मतदारांना 1 मत द्यावे लागेल.
इतर 28 महापालिका: बहुतांश 28 महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत (Multi-member Ward) आहे.
बहुतांश प्रभागात 4 उमेदवार निवडून द्यायचे आहेत.
काही प्रभागात 3 किंवा 5 उमेदवार देखील असतील.
या 28 महापालिकांत मतदारांना एका प्रभागात साधारणतः 3 ते 5 मते द्यावी लागतील.
मतदानाची घोषणा झाल्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीच्या तयारीसाठी ‘लागा कामाला’ असा संदेश मिळाला आहे.
महानगरपालिका निवडणुकीचे वेळापत्रक
उमेदवारी दाखल :- 23 ते 30 डिसेंबर
उमेदवार अर्जाची छाननी :- 31 डिसेंबर
उमेदवारी मागे घेण्याची मुदत :- 2 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी :- 3 जानेवारी 2026
मतदान :- 15 जानेवारी 2026
मतमोजणी :- 16 जानेवारी 2026
एकूण 29 महानगरपालिका
बृहन्मुंबई (BMC), पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, सोलापूर, जळगाव, पनवेल, वसई विरार, मालेगाव, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, अकोला, अमरावती, नांदेड वाघाळा, परभणी, अहिल्यानगर, धुळे, जालना, सांगली मिरज कुपवाड, इचलकरंजी आणि मीरा भाईंदर महानगरपालिका.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…