Maharashtra MLA Latest News : शहरी व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांचा घेणार आढावा; भाजप, शिवसेना आणि काँग्रेसच्या युवा नेत्यांचा समावेश
मुंबई | महाराष्ट्रातील शहरांचा कायापालट करण्यासाठी आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी राज्य विधिमंडळाचे 15 आमदार लंडनच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. 15 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या या दौऱ्यात लंडनमधील जागतिक दर्जाचे शहरी व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. या दौऱ्यात सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या प्रमुख नेत्यांचा समावेश असल्याने याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट
लंडन हे जगातील प्रगत शहरांपैकी एक मानले जाते. तिथली महापालिका (Greater London Authority) नागरिकांना कशा प्रकारे सेवा देते, तिथले रस्ते नियोजन आणि जुन्या पायाभूत सुविधांचा वापर करून आधुनिक सेवा कशी दिली जाते, याचा अभ्यास हे या भेटीचे मुख्य उद्दिष्ट आहे. विशेषतः मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या वाढत्या शहरांच्या नियोजनासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण ठरेल, असे मानले जात आहे.
सर्वपक्षीय ‘तरुण’ फळीला संधी
या दौऱ्यात प्रामुख्याने तरुणांना आणि अभ्यासू आमदारांना प्राधान्य देण्यात आले आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…