देश-विदेश

Maharashtra ATS News : खेळाडूंच्या आडून दहशतवादाचे जाळे विणण्याचा कट उधळला! महाराष्ट्र ATS ची यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये मोठी धडक कारवाई

Maharashtra ATS Latest News : मैदानावरील फुटबॉलपटू दहशतवादी संघटनांच्या रडारवर; 21 ठिकाणी मध्यरात्री छापेमारी करत संशयास्पद तलवारी आणि पुरावे जप्त

मुंबई | महाराष्ट्रातील शांतता भंग करण्यासाठी दहशतवादी संघटनांनी आता खेळाच्या मैदानाचा आधार घेण्याचा एक भयंकर कट रचला होता, जो महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) आपल्या सतर्कतेमुळे पूर्णपणे उधळून लावला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, उमरखेड आणि अहिल्यानगर या भागांतील फुटबॉलपटूंना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे ब्रेनवॉश करण्याचा कट या संघटनांनी आखला होता. मात्र, एटीएसने गेल्या काही महिन्यांपासून या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून एकाच वेळी 21 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवत या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ, पुसद आणि उमरखेड या भागात फुटबॉल या खेळाची मोठी क्रेझ असून तिथे अनेक फुटबॉल क्लब कार्यरत आहेत. या संघटनांचा प्लॅन असा होता की, खेळाडूंना प्रशिक्षणाच्या बहाण्याने देशाबाहेर पाठवायचे, तिथे त्यांचे मानसिक परिवर्तन (Brainwash) करायचे आणि त्यानंतर त्यांना दहशतवादी कारवायांसाठी ढाल म्हणून वापरायचे. क्रीडा क्षेत्रातील तरुणांच्या ओढीचा फायदा घेऊन त्यांना देशविरोधी मार्गावर नेण्याचा हा प्रयत्न एटीएसच्या धडक कारवाईमुळे फसला आहे.

या मोहिमेसाठी एटीएसने अत्यंत गोपनीय नियोजन केले होते. चार दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास यवतमाळच्या पुसद आणि उमरखेड भागात 14 ठिकाणी, तर अहिल्यानगरच्या मुकुंदनगर परिसरात 7 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. मुकुंदनगर हा भाग गेल्या काही वर्षांत औरंगजेबाच्या उदात्तीकरणाच्या प्रयत्नांमुळे आणि वादग्रस्त घोषणाबाजीमुळे चर्चेत आला होता. या छाप्यात पोलिसांनी केवळ संशयितांची चौकशीच केली नाही, तर अहिल्यानगरमधून काही संशयास्पद तलवारी आणि गुन्ह्याशी संबंधित महत्त्वपूर्ण तांत्रिक पुरावेही जप्त केले आहेत.

खेळाडूंच्या आडून दहशतवादाचे हे नवे जाळे विणले जाण्यापूर्वीच एटीएसने त्याचा नायनाट केला आहे. या कारवाईत जप्त केलेल्या पुराव्यांच्या आधारे आता यामागे नक्की कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा हात आहे आणि या तरुणांना परदेशात पाठवण्याचे आर्थिक पाठबळ कोठून मिळत होते, याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. एटीएसच्या या कारवाईमुळे राज्यभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून क्रीडा क्षेत्राला लागणारी ही दहशतवादाची वाळवी वेळीच ठेचल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

12 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

12 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

18 hours ago