Maharashtra Assembly Monsoon Session : शिंदे सरकारचे शेवटचे अधिवेशन..
Maharashtra Assembly Monsoon Session Latest Update : विरोधक आक्रमक, शेतकरी, पुणे अपघात,ड्रग्ज प्रकरण गाजण्याची शक्यता
मुंबई :- राज्य विधिमंडळाचे आजपासून 27 जुन ते 12 जुलै या कालावधीकरिता राज्य सरकारचे शेवटचे अधिवेशन आहे. शिंदे सरकारच्या काळातील हे शेवटचे अधिवेशन Assembly Monsoon Session आहे. काही दिवसातच राज्यात विधानसभेच्या निवडणुका Vidhan Sabha Election होणार आहे तत्पूर्वी राज्य सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असल्यामुळे हे अधिवेशन विरोधक गाजवणार असल्याचे दिसून येते. विरोधकांनी कालच्या सरकारच्या चहापाण्याच्या कार्यक्रमावर ही बहिष्कार टाकला आहे. Maharashtra Assembly Monsoon Session Latest Update
पावसाळी अधिवेशन Assembly Monsoon Session असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई चा मुद्दा तसेच पिकांना हमीभावाचा मुद्दा अधिवेशनात गाजणार आहे. पुणे कार अपघात प्रकरण, पुणे ड्रग्स प्रकरण, तसेच अकरा आमदाराच्या नियुक्ती बाबत ठाकरे गटाकडून अधिक आक्रमक होण्याची शक्यता दिसून येत आहे. यांसारख्या मुद्द्यामुळे अधिवेशन चांगलेच गाजणार असल्याचे दिसून येते. राज्य सरकारच्या वतीने अधिवेशनात अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार 28 जूनला अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होईल. सकाळी 11:00 वाजल्यापासून अधिवेशनाला सुरुवात होणार असून सुरुवातीच्या काळात लोकसभेवर निवडून गेलेल्या आमदारांचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष जाहीर करतील. तर या हंगामात जे आमदार दुःखद निधन पावले आहे त्यांच्या शोक प्रस्तावावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून भाषण केले जाईल. Maharashtra Assembly Monsoon Session Latest Update