मुंबई

Maharashtra Assembly Monsoon Session : विधानभवनात ‘शक्तिपीठ’चा झणझणीत गजर; शेतकरी, विद्यार्थी आणि अपघाताचे मुद्दे तापले

Maharashtra Assembly Monsoon Session : “गजनी सरकार, विसरभोळा कारभार” — रोहित पवारांचे घणाघाती बॅनर आंदोलन

मुंबई :– राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा Maharashtra Assembly Monsoon Session दुसरा दिवस विविध मुद्द्यांनी गाजला. विरोधकांनी शक्तिपीठ महामार्ग, बीड लैंगिक अत्याचार प्रकरण, आणि मुंब्रा लोकल अपघात या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यामुळे अधिवेशनाचे वातावरण चांगलेच तापले.

शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात स्थानिक शेतकरी आणि आमदारांनी विधानभवनाबाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केले. हातात फलक घेऊन, पायऱ्यांवर बसून, विविध बॅनरद्वारे त्यांनी सरकारचा निषेध केला.

नाना पटोले यांनी भाजप नेते बबनराव लोणीकर आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी माफी मागावी, अशी मागणी करत पटोले आणि विजय वडेट्टीवार थेट अध्यक्षांच्या डायसपर्यंत गेले. मात्र पटोले यांनी वापरलेल्या असंसदीय भाषेवरून सभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाच मिनिटांसाठी सभा तहकूब केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज विधानभवन परिसरात बॅनरबाजी करत सरकारवर कडवट टीका केली. “आज कृषी दिन आहे, पण सरकारचे धोरण विसरभोळे आणि घोषणांपुरतेच राहिले आहे. 7/12 डिजिटल करण्याचे आश्वासन, सन्मान निधी वाढ, कर्जमाफी, पीकविमा — या सर्व गोष्टी हवेतच आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

“हे गजनी सरकार आहे, ज्यांना शेतकऱ्यांची आठवण फक्त कृषी दिनाच्या भाषणापुरतीच होते,” अशी खोचक टिप्पणी करत त्यांनी सरकारच्या ‘विस्मरणशक्ती’वर सवाल उपस्थित केला.

vivek

Recent Posts