महाराष्ट्र
Trending

Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मोठी कारवाई, 28 बंडखोर उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी

Congress Take Action On 28 Assembly Member : काँग्रेसने 28 बंडखोर उमेदवारांवर कारवाई केली आहे. एमव्हीएच्या उमेदवारांविरुद्ध अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या 28 बंडखोरांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.

Maharashtra Assembly Elections : 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात विधानसभेच्या 288 जागांवर मतदान होणार आहे. त्याआधी महाविकास आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेसने बंडखोर Congress Member उमेदवारांवर मोठी कारवाई केली आहे.काँग्रेसच्या महाराष्ट्र युनिटने रविवारी 28 बंडखोर उमेदवारांना ‘पक्षविरोधी’ कारवायांसाठी सहा वर्षांसाठी निलंबित केले. राज्यातील 22 विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत हे उमेदवार महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध लढत आहेत.

माजी मंत्री राजेंद्र मुळक (रामटेक मतदारसंघ), याज्ञवल्क्य जिचकार (काटोल), कमल व्यवहारे (कसबा), मनोज शिंदे (कोपरी पाचपाखाडी) आणि आबा बागुल (पार्वती) या प्रमुख नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.एआयसीसीचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आल्याचे काँग्रेसच्या निवेदनात म्हटले आहे.

पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या बंडखोर उमेदवारांमध्ये सिंदखेडामधून बंडखोर शामकांत सनेर, श्रीवर्धनमधून राजेंद्र ठाकूर, पार्वतीमधून आबा बागुल, शिवाजीनगरमधून मनीष आनंद, परतूरमधून सुरेश कुमार जेथलिया आणि कल्याण बोराडे, रामटेकमधून चंद्रपाल चौकसे, सोनल कोवे यांचा समावेश आहे. , मनोज शिंदे,अविनाश लाड, आनंदराव गेडाम, शब्बीर खान, हंसकुमार पांडे, मंगल भुजबळ, अभिलाषा गावतुरे, कमल व्यवहारे, मोहनराव दांडेकर, प्रेमसागर गणवीर, याज्ञवल्क्य जिचकार, अजय लांजेवार, राजेंद्र मुळक, विजय खडसे आणि विलास पाटील यांच्या नावांचा समावेश आहे.

2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात निकराची लढत होणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0