क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Bhayandar Fraud Case : धक्कादायक! कार भाड्याने लावून देण्याच्या आमिषाने फसवणूक; कोट्यावधीचा हजारो लोकांना गंडा

Bhayandar Latest Car Fraud Case : तब्बल 1375 गुंतवणूकदारांची 20 कोटीहुन‌ अधिक फसवणूक ; ज्या वाहनधारकांची फसवणूक केली आहे त्यांनी काशिमीरा पोलिसात तक्रार करावी असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.

भाईंदर :- मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, मीरा रोड, वसई विरार शहरातील नवीन गाड्या एअरपोर्ट व जीएनपीटी बंदर येथे भाड्याने दिल्याने प्रत्येकी गाडीमागे 55 हजार ते 75 हजार असे भाडे मिळेल आमिष दाखवून अनेक गाड्या मालकांना गंडा कोट्यावधीचा घालणाऱ्या एका महाठगाला काशिमीरा पोलिसांनी Kashmira Police Latest News अटक केली आहे. Bhayandar Latest Car Fraud Case संदीप सुरेश कांदळकर ऊर्फ राजु राजीव जोशी असे या ठगाचे नाव असून त्याने आजपर्यंत तब्बल 1375 गुंतवणूकदारांची 20 कोटी 60 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच आरोपीने तब्बल 250 गाड्या त्यामध्ये टेम्पो, कार स्वतःच्या ताब्यात ठेवले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावेश शंकर अंबवणे, (रा. महाजनवाडी, मिरारोड पुर्व) यांनी काशिमिरा पोलीस ठाण्यात फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय सहिता ‌318(4),316(2),3(5),111 सह महाराष्ट्र ठेवीदाराचे अधिनियमन 1999 कलम 3,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यातील आरोपी संदीप सुरेश कांदळकर उर्फ राजू राजीव जोशी यांनी फिर्यादी यांच्या नावे नवीन गाड्या शोरूम मध्ये बुक करून त्या गाड्या एअरपोर्ट आणि जेएनपीटी बंदर येथे भाड्याने लावून प्रत्येकी गाडीमागे 55 ते 75 हजार रुपये भाडे मिळेल. भाड्याच्या रकमेतून कर्जच हप्ता बघत उर्वरित रक्कम प्रत्येकी गाडीमागे भाडे देतो अशी स्कीम सांगून बुकिंग साठी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर लेखी करारनामा करून रोख रक्कम तसेच बँक खात्याच्या ऑनलाईन पैसे स्वीकारले. त्यानंतर गाडी बुक करून घेतलेली रक्कम गाड्यांचे स्वतःच्या ताब्यात करून आर्थिक फसवणूक झाल्याची पोलिसांकडून सांगितले. या प्रकरणाचा छडा लावताना पोलिसांनी तपासा दरम्यान मुख्य आरोपी संदिप सुरेश कांदळकर (राजू राजीव जोशी बनावट नाव) यांना रत्नागिरी येथून अटक केली आहे. तसेच त्याच्या साथीदार सचिन सुनील तेटगुरे (रा. दापोली, जि.रत्नागिरी) त्याला अटक करून इतर सात आरोपी असल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले आहे. या संपूर्ण प्रकरणात संदीप यांनी तब्बल 1375 गुंतवणूकदारांचे 20 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. तसेच 250 गाड्या यांनी स्वतःच्या ताब्यात ठेवल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी संदीप याच्यावर एकूण 13 गुन्हे दाखल असून दहा वर्षांमध्ये अशाच प्रकारे त्यांनी मोठी आर्थिक फसवणूक केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त मि.भा.व.वि.,दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त . मि.भा.व.वि., प्रकाश गायकवाड, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-1, मिरारोड विभाग, विजयकुमार मराठे, सहा. पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, काशिमीरा पोलीस ठाणे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले असून त्यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0