एटीएस पोलिसांची कारवाई,अवैधरित्या मुंबईत वास्तव्य करणाऱ्या घुसखोर बांग्लादेशी नागरिकास अटक

Mumbai ATS Take Action Against Illegale Bangladeshi Migrant : मुंबईच्या रे रोड भागात संशयितरित्या असलेल्या एक बांगलादेशी नागरिकास एटीएस पोलिसांनी अटक केली आहे. नोयोन तोकिचोर शेख (24 वय) असे अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोराचे नाव आहे.
मुंबई :- 31 डिसेंबरला मुंबई पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने मुंबई शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता विशेष काळजी घेतली होती. Mumbai ATS Police यावेळी पोलिसांनी गस्तीदरम्यान एका बांगलादेशीय नागरिकाला बेकायदा भारतात वास्तव्य केल्याप्रकरणी अटक केली आहे.नोयोन तोकिचोर शेख (24 वय, सध्या रा. सेक्टर 5 तळोजा नवी मुंबई, मूळ रा. देश बांगलादेश) असे अटक करण्यात आलेल्या बांगलादेश नागरिकाचे नाव आहे. Mumbai Illegal Bangladeshi Migrant मागील काही वर्षांपासून तो नवी मुंबईत इलेक्ट्रिशन म्हणून काम करत होता.
पोलीस उपनिरीक्षक व्यवहारे एटीएस पथक, पोलीस शिपाई इंतेजकुमार वळवी, स्वप्निल पाटील, गणेश कोळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हसन मुलाणी, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण, सहाय्यक फौजदार चंद्रशेखर परब यांच्या गस्ती घालत असताना एक व्यक्ती सार्वजनिक शौचालय रे रोड मुंबई येथे संशयितरित्या फिरत असताना पोलिसांना आढळून आले आहे. त्याच्याकडे तो भारतीय असल्याची ओळख दाखवणारे पुरावे मागितले असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. संशयिताला विश्वासात घेवून त्याची चौकशी केली. यावेळी त्याने बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली आणि मागील अनेक वर्षांपासून तो नवी मुंबई येथे राहत असल्याचे सांगितले.
आरोपी विरुद्ध काळाचौकी पोलीस ठाण्यात पारपत्र (भारतात प्रवेश) नियम 1950 चे कलम 3 (अ) 6 (अ) सह परकीय नागरिकांचा कायदा 1946 चे कलम 14 अ अन्वये ठाण्यात गुन्हा दाखल करत, त्याला 1 जानेवारी रोजी अटक केल्याची माहिती दिली. आरोपीला न्यायालय समोर हजर केले असता 4 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस पथक
पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (का व सु) सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, अनिल पारसकर, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ 4, रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त भोईवाडा विभाग, घनश्याम पलंगे, जगदीश शेलकर,वरीष्ठ पोलीस ठाणे काळाचौकी पोलीस ठाणे यांच्या मार्गदशानाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धनंजय व्यवहारे दहशतवादी विरोधी कक्ष पोलीस शिपाई इंतेजकुमार वळवी,स्वप्निल पाटील,गणेश कोळेकर यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहे.