Mahakumbh Tragedy:महाकुंभात आणखी एक भीषण अपघात, हेलियम गॅसने भरलेला हॉट एअर बलून फुटला, 6 भाविक दगावले
Mahakumbh Tragedy: हेलियम वायू भरल्यानंतर फुगा जमिनीवरून उडत असताना जोरात फुगा फुटल्याने हा अपघात झाला. त्यामुळे बास्केट बसलेले सर्व भाविक गंभीररित्या भाजले.
ANI :- प्रयागराज महाकुंभमध्ये आणखी एक मोठी दुर्घटना घडली आहे. Mahakumbh Tragedy सोमवारी, येथे हेलियम वायूने भरलेल्या हॉट एअर बोलून स्फोट झाला, त्यात त्याच्या बास्केट मधून प्रवास करणारे सहा भाविक गंभीर जखमी झाले. यातील एका भाविकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.जखमींना तत्काळ वैद्यकीय महाविद्यालय संचालित स्वरूप राणी नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
महाकुंभमेळा परिसरातील सेक्टर 20 येथील आखाडा मार्गाजवळ हा अपघात झाला असून, बसंत पंचमीच्या स्नानाच्या वेळी सोमवारी दुपारी हीलियम वायूने भरलेला हॉट बोलून फुटला. हीलियम वायू भरल्यानंतर फुगा जमिनीवरून उडत असताना हा फुगा मोठा आवाज होऊन फुटला तेव्हा ही दुर्घटना घडली.जिथे त्यांची गंभीर प्रकृती पाहता सर्वांना वैद्यकीय महाविद्यालय संचालित स्वरूप राणी नेहरू रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.