पुणे

Pune News : रेव्ह पार्टी प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना मोठा दिलासा; अखेर जामीन मंजूर

•Pune Rave Party : पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहात पकडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ, रोहिणी खडसे पतीसाठी मैदानात

पुणे :- पुण्यात रेव्ह पार्टी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक महिन्यांच्या न्यायालयीन लढाईनंतर कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे, ज्यामुळे या प्रकरणात एक नवीन वळण आले आहे.

काय आहे प्रकरण?

काही महिन्यांपूर्वी पुण्यातील खराडी भागात एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. यावेळी अनेक उच्चभ्रू व्यक्तींसह प्रांजल खेवलकर यांनाही रंगेहात पकडण्यात आले होते. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खेवलकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे अश्लील व्हिडीओ सापडल्याचा दावा करत, हे एक मोठे रॅकेट असून, अनेक महिलांना खेवलकरांनी फसवले असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

रोहिणी खडसे पतीसाठी मैदानात

पतीवर झालेल्या या गंभीर आरोपांनंतर एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे या पतीच्या पाठिशी उभ्या राहिल्या होत्या. त्या पतीसाठी कोर्टात धावपळ करताना दिसल्या. यावेळी त्यांनी ‘योग्यवेळी मी सर्व गोष्टींवर उत्तरे देईन,’ असे स्पष्ट केले होते. दुसरीकडे, एकनाथ खडसे यांनीही या प्रकरणी सावध भूमिका घेत ‘जर माझा जावई चुकीचा असेल, तर मी त्याचे समर्थन करणार नाही,’ असे म्हटले होते.

आता प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळाल्यामुळे या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जामीन मंजूर झाल्यानंतर खेवलकर आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणती प्रतिक्रिया येते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0