मुंबई

Mahajan Vs Khadse : महाजन विरुद्ध खडसे – मुलाच्या मृत्यूवरून वाद शिगेला! CBI चौकशीची मागणी, मालमत्तेवरही प्रश्न

•“माझ्या मुलाचा खून म्हणतोस? तर चौकशी करा!” – खडसेंचा महाजनांना थेट इशारा

मुंबई :- मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचे राजकीय नाट्य चिघळले असून, आता ते वैयक्तिक पातळीवर पोहोचले आहे. हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपी प्रफुल लोढा यांच्या कथित विधानांचा संदर्भ देत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या मुलाच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला.

“खडसेंनी स्वतःच आपल्या मुलाचा खून केला, असं प्रफुल लोढा म्हणतो,” असा खळबळजनक दावा महाजनांनी केला. यावर खडसेंनी संतप्त प्रतिक्रिया देत थेट CBI चौकशीची मागणी केली.

“मी माझ्या एकुलत्या एक मुलाचा खून केला, असा आरोप जर कोणी करतो, तर हिमंत असेल तर तात्काळ CBI चौकशी करा,” असे खडसेंनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले.

“निखिलच्या मृत्यूनंतर मी तीन दिवस घरी नव्हतो. मृत्यूच्या दिवशीही नव्हतो,” अशी स्पष्टता त्यांनी दिली. याच वेळी खडसेंनी महाजनांच्या संपत्तीवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले.

“शाळा मास्तराचा मुलगा इतक्या संपत्तीचा मालक कसा? तीन बत्तीमध्ये फ्लॅट कुठून आला? जावयाच्या नावावर काय काय आहे?” असा रोखठोक सवाल त्यांनी केला.

प्रफुल लोढावर सध्या अंधेरी, साकीनाका अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होत आहेत. एकाच DCPच्या अधिकारक्षेत्रात हे सर्व गुन्हे नोंदले जात आहेत, हेच संशयास्पद असल्याचं खडसे म्हणाले.

“गिरीश महाजन तीन महिने हॉटेल ट्रायडेंटमध्ये माझे पाय धरत होते, असं लोढा म्हणतो,” असा दावा करीत “या प्रकरणात महाजनच अडकलाय, असा माझा ठाम संशय आहे,” असं खडसे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांविषयी कोणताही रोष नाही, पण त्यांना Nashikमधील व्यक्ती आणि हॉटेलची माहिती आहे. त्यामुळे यावर तात्काळ SIT नेमा,” अशी जोरदार मागणीही त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0