क्राईम न्यूजपुणे

Mahadev betting app : पुणे ग्रामीण पोलीस ; महादेव बेटिंग ॲप मधील 94 आरोपींना एकाच दिवशी जामीन मंजूर

Mahadev betting app : महादेव बेटिंग ॲप प्रकरणातील पुण्याच्या नारायण गावातील एका कॉल सेंटरवर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर 94 आरोपींना अटक केली होती, आरोपींना एकाच दिवशी जामीन मंजूर, मास्टर माईंड राज बोकरिया आणि ऋत्विक कोठरी यांनाही जामीन मंजूर

पुणे :- महादेव बुक Mahadev betting app आणि लोटस 365 ॲपद्वारे ऑनलाइन सट्टाप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी नारायणगाव येथील एका कॉल सेंटरवर मे 2024 दरम्यान छापा टाकला. या कॉल सेंटरमधील 94 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कॉल सेंटर चालवणाऱ्या दोघांची नावे राज बोकरिया आणि ऋत्विक कोठरी यांना पोलिसांनी मुख्य आरोपी म्हणून अटक केली होती. परंतु, न्यायालयाने या 94 आरोपींना जामीन मंजूर करून केला आहे. तसेच मास्टर माईंड असलेल्या कॉल सेंटर चालवणाऱ्या दोघांना राज बोकरिया आणि ऋत्विक कोठरी यांना हि जामीन मंजूर झाले आहे. Mahadev betting app Case

काय आहे महादेव बेटिंग प्रकरण?

‘महादेव’ नावाच्या ॲपद्वारे अवैध ऑनलाइन सट्टेबाजीचा काळा धंदा सुरू असल्याचे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तपासात उघड झाले आहे. तपासात मोठ्या रकमेचे अवैध व्यवहारही उघड झाले. यामध्ये लोक पोकर, पत्ते खेळ, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस अशा विविध खेळांवर आणि भारतीय निवडणुकांवरही सट्टा लावत असत.त्यांच्याकडे ‘तीन पट्टी’ आणि पोकर सारखे गेम तसेच ‘ड्रॅगन टायगर’ आणि व्हर्च्युअल क्रिकेट मॅचसारखे गेम होते. या प्लॅटफॉर्मवर मॅच फिक्सिंग आणि क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. या प्रकरणात अनेक राजकारणी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचा सहभाग असल्याच्या बातम्या येत आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, महादेव बेटिंग ॲप प्रकरणातील गुन्ह्याची अंदाजे कमाई सुमारे 6,000 कोटी रुपये आहे. Mahadev betting app Case

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात यापूर्वी ईडी आणि पोलिसांनी छत्तीसगड राज्य, नोएडासह अन्य काही शहरांत महादेव बेटिंग ॲपच्या कॉल सेंटरवर कारवाई केली आहे. या ॲपद्वारे कोट्यवधी रुपयांचा ऑनलाइन सट्टा खेळला जात होता. याचे ‘नेटवर्क’ दुबई, सिंगापूर, नेपाळ, मलेशिया, थायलंड आणि हाँगकाँगपर्यंत पसरल्याची माहिती तपासात समोर आली होती. Mahadev betting app Case

Web Title : Mahadev betting app: Pune Rural Police; 94 accused in Mahadev betting app granted bail on the same day

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0