
Maha Vikas Agahdi News : विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्या विरोधात राज्यपालांकडे तक्रारीचे निवेदन
मुंबई :- राज्यात महायुती सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. सत्ताधारी पक्षाला साथ देऊनही नियमबाह्य पद्धतीने काम करणाऱ्या विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या Maha Vikas Agahdi Meet Governor आमदारांनी राजभवनात जाऊन राज्याचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन द्वारे अध्यक्ष आणि सभापती यांच्या विरोधात दिले आहे.



विधानपरिषद आणि विधानसभा सभागृहात सभापती आणि अध्यक्ष यांच्याकडून सभागृहाच्या कामकाजात पक्षपाती व एकांगी भूमिकेचा अवलंब केला जात आहे. दोन्हीही सभागृहाच्या कार्यवाहीमध्ये संसदीय परंपरेचे पालन न करता नियमबाह्य सभागृहाचे कामकाज चालवले जात असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या आमदारांनी केला आहे. तसेच त्यांची भूमिका ही सरकार विरोधी नसून सरकारच्या निर्णयावर आणि धोरणावर अंकुश ठेवणारी आहे आवश्यक तेथे टीका करणे आणि पर्यायी धोरण सुचविणे हे देखील आवश्यक आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह विधिमंडळ गटनेते आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, अनिल परब, भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड अन्य महाविकास आघाडीचे आमदार उपस्थित होते.