आरोग्यदेश-विदेश
Trending

मध्यप्रदेश खोकला सिरप मृत्यूकांड: श्रीसन फार्माचा संचालक गोवींदन रंगनाथन चेन्नईतून अटक

Cough Syrup Death : 200 मुलांचा बळी घेणाऱ्या Coldriff सिरपचा मोठा खुलासा; विषारी रसायन 486 पट जास्त, खरेदीचे बिल नाही

ANI :- मध्यप्रदेशातील खोकला सिरप मृत्यूकांडात (Madhya Pradesh Cough Syrup Death Case) मोठी कारवाई झाली आहे. या मृत्यूकांडाला जबाबदार असलेल्या श्रीसन फार्मा (Shrison Pharma) कंपनीचे संचालक गोवींदन रंगनाथन (Govindan Ranganathan) याला मध्य प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) तामिळनाडूतील चेन्नईतून अटक केली आहे. रंगनाथन हा पत्नीसह फरार झाला होता. Cough Syrup Death

एसआयटीने बुधवारी रात्री चेन्नईत छापा टाकत ही कारवाई केली. या कारवाईत कंपनीकडून महत्त्वाची कागदपत्रे, औषधांचे नमुने आणि उत्पादन रेकॉर्ड जप्त करण्यात आले आहेत. चेन्नई-बेंगळुरू महामार्गावरील रंगनाथनचे अपार्टमेंट सील करण्यात आले असून, कोडंबक्कम येथील नोंदणीकृत कार्यालय बंद आढळले.

मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्यांची संख्या 24 वर

दरम्यान, Coldriff खोकला सिरप प्राशन केल्यानंतर मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांची संख्या 24 वर पोहोचली आहे. छिंदवाडाच्या उमरेठ तहसीलमधील पचधर गावातील रहिवासी असलेल्या तीन वर्षीय मयंक सूर्यवंशीचा बुधवारी रात्री नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

विषारी केमिकल 486 पट जास्त, बिल किंवा नोंद नाही

Coldriff सिरपच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. तामिळनाडूच्या ड्रग्ज कंट्रोल डायरेक्टरच्या अहवालानुसार, हे सिरप नॉन-फार्मास्युटिकल ग्रेड केमिकल्सपासून बनवले गेले होते.

विषारी केमिकल खरेदी: कंपनीने तोंडी कबूल केले की त्यांनी दोन हप्त्यांमध्ये प्रोपीलीन ग्लायकॉलच्या (Propylene Glycol) १०० किलो विषारी केमिकलच्या दोन पिशव्या खरेदी केल्या होत्या.

बिल आणि रेकॉर्ड नाही: तपासणीदरम्यान या खरेदीचे कोणतेही बिल आढळले नाही आणि खरेदीच्या नोंदीही करण्यात आल्या नाहीत. पेमेंट कधी रोखीने तर कधी जी-पे (G-Pay) द्वारे करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

शुद्धता तपासली नाही: कंपनीने निकृष्ट दर्जाचे प्रोपीलीन ग्लायकॉल खरेदी केले आणि त्याची कधीही चाचणी करण्यात आली नाही.

विषारी प्रमाण: प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉल (DEG) आणि इथिलीन ग्लायकॉल (EG) सारखी विषारी रसायने परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा 486 पट जास्त प्रमाणात होती. या प्रमाणाने हत्तीच्या आकाराच्या प्राण्यांच्या मूत्रपिंड आणि मेंदूलाही नुकसान होऊ शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

कागदपत्रे लपवण्याचा प्रयत्न

तपास अहवालानुसार, कंपनीने 25 मार्च 2025 रोजी चेन्नईतील सनराईज बायोटेककडून नॉन-फार्मास्युटिकल ग्रेडचे प्रोपीलीन ग्लायकॉल खरेदी केले होते. कंपनीने रसायनाची शुद्धता किंवा त्यात विषारी घटकांचे प्रमाण तपासले नाही. तामिळनाडू ड्रग्ज कंट्रोल अथॉरिटीने तपासणी सुरू केल्यावर कंपनीकडे प्रोपीलीन ग्लायकॉलचा साठा आढळला नाही, यामुळे कंपनीने रसायनाची जलद विल्हेवाट लावून कागदपत्रे लपवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय बळावला आहे. सार्वजनिक सुरक्षेसाठी ही तपासणी अत्यंत आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0