क्राईम न्यूजमहाराष्ट्र
Trending

Bribe News : ‘हप्ता’ मागणारे पोलीस लाचलुचपतच्या जाळ्यात; अमळनेरात दोन कॉन्स्टेबलसह खाजगी इसम लाच घेताना रंगेहाथ

Dhule ACB TRAP NEWS : अवैध गॅस व्यवसायाचा बागुलबुवा; 15 हजारांची मागणी, तडजोडीअंती 12 हजार स्वीकारताना ‘एसीबी’चा सापळा

धुळे,अमळनेर :- ‘अवैध धंदा करायचा असेल तर हप्ता द्यावा लागेल,’ अशी धमकी देऊन एका व्यावसायिकाकडून लाच मागत असलेले अमळनेर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकले आहेत. या दोन्ही पोलिसांना लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांच्या एका खाजगी साथीदारासह रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. Dhule ACB Trap News

नेमके काय घडले?

अमळनेरमधील धुळे रोड परिसरात एक व्यावसायिक वाहनांमध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय करतो. त्याचा हा व्यवसाय अवैधरित्या सुरू असल्याचा दावा करून पोलीस कॉन्स्टेबल अमोल राजेंद्र पाटील आणि जितेंद्र रमणलाल निकुंभे यांनी त्याच्याकडे दरमहा 15,000 रुपयांची लाच मागितली. ‘जर हप्ता दिला नाही, तर तुमच्यावर गुन्हा दाखल करू,’ अशी धमकीही त्यांनी दिली. या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाने धुळे येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. Dhule ACB Latest News

‘एसीबी’चा यशस्वी सापळा

तक्रारीची पडताळणी केल्यावर एसीबीने सापळा रचण्याचे ठरवले. तडजोडीअंती दोन्ही पोलिसांनी 12,000 रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. ठरल्यानुसार, अमळनेरच्या बहादरपूर रोडवरील एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये लाचेची रक्कम स्वीकारली जाणार होती. यावेळी, दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी ही रक्कम त्यांचा खाजगी साथीदार उमेश भटू बारी याच्या हस्ते स्वीकारली. Dhule Police Latest News

अचूक माहिती मिळाल्यानंतर एसीबीच्या पथकाने तिघांनाही त्याच क्षणी रंगेहाथ पकडले. एसीबीच्या या धडाकेबाज कारवाईमुळे पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0