क्राईम न्यूजपुणे
Trending

Lonikand Police News | पुण्यात गुन्हेगारी टोळीकडून ७ पिस्टल, २३ काडतुसे जप्त : अट्टल गुन्हेगार ‘जंगल्या’वर होता डाव !

  • लोणीकंद वपोनि पंडित रेजितवाड व तपास पथकाकडून धडाकेबाज कारवाई

पुणे, दि. ८ सप्टेंबर, मुबारक जिनेरी, महाराष्ट्र मिरर : Lonikand Police News

पूर्ववैमनस्यातून अट्टल गुन्हेगाराला संपविण्याचा डाव लोणीकंद पोलिसांनी उधळून लावला आहे. डाव टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला बेड्या ठोकून तब्बल ७ गावठी पिस्टल व २३ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. लोणीकंद पोलिसांकडून गणेशोत्सवात होणारा मोठा गुन्हा रोखण्यात आला आहे. सदर धडाकेबाज कामगीरी पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ४ हिम्मत जाधव, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे पंडीत रेजितवाड, तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे व पथकाने केली आहे.

अट्टल गुन्हेगार विशाल उर्फ जंगल्या सातपुते याचा काटा काढण्याच्या तयारीत असलेल्या हडपसर, स्वारगेट, लोहियानगर येथील एन्जॉय ग्रुप मधील टोळीला लोणीकंद पोलिसांनी मोठ्या शिफातीने ताब्यात घेतले आहे. पुण्यात एकापाठोपाठ खून घडत असताना लोणीकंद पोलिसांच्या तपासाने खुनाचा गुन्हा रोखला गेला आहे.

याप्रकरणी आरोपी नामे १) शुभम ऊर्फ मॅटर अनिल जगताप, वय २७ वर्ष २) सुमित उत्तरेश्वर जाधव, वय २६ वर्ष ३) अमीत म्हस्कु अवचरे, वय २७ वर्ष, ४) ओंकार ऊर्फ भैय्या अशोक जाधव, वय २४ वर्ष ५) अजय ऊर्फ सागर बाळकृष्ण हेगडे, वय २७ वर्ष, ६) राज बसवराज स्वामी, वय २६ वर्ष ७) लतिकेश गौतम पोळ यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर ८४७/२०२४, आर्म अॅक्ट कलम ३(२५), भा. न्याय संहीता कलम ३ (५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१), १३५ अन्वये दाखल गुन्हयातील फिर्यादी व साक्षीदार हे सराईत गुन्हेगार असुन ते दिनांक २९/०८/२०२४ सासवड येथील दहीहंडीचा कार्यक्रम संपवुन हडपसर, मांजरी मार्गे कोलवडी येथिल त्यांचे राहते घरी येत असताना त्यांचा विरोधक सुमित उत्तरेश्वर जाधव व इतर यांनी पुर्ववैमनस्यातुन कट कारस्थान रचुन कोलवडी परिसरात सापळा लावुन नमुद गुन्हयातील फिर्यादी व साक्षीदार यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, यांचे मार्गदर्शना खाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि रविंद्र गोडसे व तपास पथकातील अंमलदार यांची दोन पथके तयार करुन आरोपींचा शोध घेणेकरिता सासवड, हडपसर, कोंढवा, कात्रज परिसरात एक पथक तसेच चाकण, पिंपरी चिंचवड, मुळशी परिसरात दुसरे पथक रवाना करण्यात आले. पोलीस अंमलदार कैलास साळुंके, स्वप्नील जाधव, अजित फरांदे, शुभम चिनके, साईनाथ रोकडे, अमोल ढोणे, दिपक कोकरे यांचे पथकाने केलेल्या तपासात नमुद दाखल गुन्हा हा हडपसर, स्वारगेट, लोहियानगर येथील एन्जॉय ग्रुप मधील सदस्यांनी केला असल्याचे गोपणीय बातमीदारा मार्फतीने माहिती कळाली. त्या अनुषंगाने तपास पथकाने हडपसर भेकराईनगर परिसरात तळ ठोकुन एन्जॉय ग्रुप मधील सदस्यांची माहिती प्राप्त केली असता नमुद गुन्हयात एन्जॉय ग्रुपचे सदस्य यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

नमुद आरोपींचा शोध घेत असताना गोपणीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमीनुसार आरोपी नामे १) शुभम ऊर्फ मॅटर अनिल जगताप, वय २७ वर्ष, २) सुमित उत्तरेश्वर जाधव, वय २६ वर्ष, यांना मुंढवा परिसरात सापळा रचुन ताब्यात घेण्यात आले. सपोनि रविंद्र गोडसे व पथकाने आरोपींकडे त्यांचे इतर साथीदारांबाबत विचारपुस करुन नवले ब्रिज कात्रज परिसरात शोध घेणेकामी सापळा लावुन आरोपी नामे ३) अमीत म्हस्कु अवचरे, वय २७ वर्ष, ४) ओंकार ऊर्फ भैय्या अशोक जाधव, वय २४ वर्ष, ५) अजय ऊर्फ सागर बाळकृष्ण हेगडे, वय २७ वर्ष, ६) राज बसवराज स्वामी, वय २६ वर्ष, ७) लतिकेश गौतम पोळ, यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांच्याकडे तपास करता त्यांनी नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. दरम्यान आरोपी नामे अमीत अवचरे व सागर हेगडे यांचे ताब्यातुन देशी बनावटीचे ०२ पिस्टल व ०९ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. तसेच नमुद आरोपींना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांची एकुण ०५ दिवसांची पोलीस कस्टडी घेण्यात आली. पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीकडुन देशी बनावटीचे ०४ पिस्टल व १२ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले.

एकंदरीत दाखल गुन्हयाचे तपासात ०७ आरोपींना अटक करुन त्यांचेकडुन देशी बनावटीचे एकुण ०७ पिस्टल व एकुण २३ जिवंत काडतुसे, गुन्हा करण्यासाठी वापरलेली दोन वाहने, ०७ मोबाईल फोन असा एकुण ९,१४,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ४. पुणे शहर, हिम्मत जाधव, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, पंडीत रेजितवाड, तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे, पोलीस अंमलदार संदीप तिकोणे, कैलास साळुंके, स्वप्निल जाधव, अजित फरांदे, सागर जगताप, अमोल ढोणे, शुभम चिनके साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, मल्हारी सपुरे, दिपक कोकरे, सुधीर शिवले सर्व लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0