Ed raids on Dino Morea: ईडीचा डाव ‘मिठी’तून मोठा उलगडा! डिनो मोरियाच्या घरी छापा
Ed raids on Dino Morea: आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर ईडीची कारवाई; महापालिका निवडणुकांपूर्वी मोठा राजकीय झटका
मुंबई:- मिठी नदी गाळ उपसा प्रकल्पातील बहुचर्चित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आता ईडीने थेट कारवाई करत बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाच्या मुंबईतील निवासस्थानी छापा टाकला. Ed raids on Dino Morea शुक्रवारी सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. डिनो मोरिया हा शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय मानला जात असल्याने या तपासाला राजकीय वळण लागल्याची चर्चा आहे.
मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यात डिनो मोरिया आणि भावाचा आर्थिक चौकशीत समावेश
सदर प्रकरणात यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेकडून डिनो मोरिया व त्याचा भाऊ सॅन्टिनो यांची चौकशी करण्यात आली होती. दोघांना काही महत्त्वाच्या कागदपत्रांसह चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. आरोपी केतन कदम याच्याशी 2019 ते 2022 या कालावधीत डिनो मोरियाचे आर्थिक व्यवहार झाल्याचं उघड झाल्यानंतर चौकशीचा क्लिष्ट प्रवास सुरू झाला आहे.
ईडीने याच प्रकरणात मुंबई, कोची आणि इतर शहरांमधील 15 पेक्षा अधिक ठिकाणी धाडसत्र राबवलं आहे. या घोटाळ्यात महापालिकेचे 3 अधिकारी,5 कंत्राटदार, 3 दलाल आणि दोन कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गैरव्यवहारामुळे महापालिकेला तब्बल 64 कोटी 54 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
20 वर्षांपासून सुरू असलेल्या मिठी नदी गाळ उपसा प्रकल्पासाठी 1100 कोटी रुपयांचं बजेट मंजूर झालं होतं. यात 18 कंत्राटदारांना काम देण्यात आलं. आता यातील आर्थिक व्यवहारांची चौकशी करत लेखापरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र ऑडिट संस्थेची नियुक्ती होणार आहे.
या घडामोडींमुळे ठाकरे गटाला महापालिका निवडणुकांआधी अडचणीत आणण्याचा प्रयत्न असल्याचं आरोप प्रतिपक्षातून येत आहेत. मात्र, ईडीकडून ही कारवाई आर्थिक घोटाळ्याच्या प्राथमिक माहितीच्या आधारे करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.


