Loksabha Election 5th Phase : वडाळा वाहतूक विभागाच्या हद्दीतील हे रस्ते बंद
•मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाच्या वडाळा विधानसभा मतदारसंघातील हे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्याचे पोलीस उप आयुक्त वाहतूक यांचे आदेश
मुंबई :- 20 मे ला मुंबईतील पाचव्या टप्प्यात पहिले मुंबईच्या सर्व लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रत्येक लोकसभा क्षेत्रातील विधानसभेचे क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या ठिकाणी वाहतुकीकरिता नियमावली जाहीर करण्यात आली आहे. वडाळा वाहतूक विभागाच्या हद्दीत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 31 मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ वडाळा विधानसभा मतदारसंघाचे मध्यवर्ती कार्यालय महानगरपालिका नवीन इमारत विद्यालंकार मार्ग वाल्मिकी चौक वडाळा या ठिकाणी असल्याने या ठिकाणी वाहतुकीसाठी बंद करण्यात आली असून वाहतुकी करता पर्यायी मार्ग पोलीस उप आयुक्त वाहतूक प्रज्ञा जेडगे यांनी निर्देश दिले आहे.
वडाळा वाहतूक विभागाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मध्यवर्ती कार्यालय असल्यामुळे या कार्यालयात निवडणुकी संदर्भातील साहित्य आणि मतदान पथकाच्या 100-125 वाहने असणार आहे. त्यामुळे पूजा जंक्शन ते वाल्मिकी चौक विद्यालंकार कॉलेज कडे जाणारा रस्ता हा वाहतुकीसाठी 19 मे सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत सात तासाकरिता आणि 20 मे सकाळी 07.00 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत असे एकूण पाच तासाने बंद करण्यात आले आहे.
वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला मार्ग
पुजा जंक्शन ते वाल्मीकी चौक (दोस्ती एकर्स) विदयालंकार कॉलेजकडे (जाणारा येणारा) रोड
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
पूजा जंक्शन (हयुम पाईप) बरकत अली जंक्शन वडाळा ब्रिज मार्गे शेख मिस्त्री रोडने एम टी विश्वासराव जंक्शन कडे.