Loksabha Election 2024 : शिंदे गटाकडून ठाकरे गटाला पुन्हा एकदा जोरदार धक्का
• Bhausaheb Kamble In Shinde Gat शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला
मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट सातत्याने उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का देत आहे. उद्धव ठाकरे गटाचे अनेक महत्त्वाचे नेते शिंदे गट आपल्याकडे वळवण्यात यशस्वी होताना दिसत आहे.नगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शिर्डीत जोरदार धक्का बसला आहे. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात गुरूवारी रात्री उशिरा प्रवेश केला आहे. Loksabha Election 2024
दरम्यान शिर्डीत विद्यमान शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांना विरोध होत होता. त्यामुळे आता शिर्डीत माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यात लोकसभेची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Loksabha Election 2024
2019 ला लोकसभेला पराभूत
भाऊसाहेब कांबळे यांनी 2019 मध्ये काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश करत श्रीरामपूर विधानसभेचे तिकीट मिळवले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. Loksabha Election 2024
विधानसभेलाही पराभव
विधानसभेत ठाकरे यांनी कांबळे यांना, तर काँग्रेसने लहू कानडे यांना तिकीट दिले होते. कानडे यांनी कांबळे यांना पराभवाची धुळ चारली. कांबळे हे ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतच होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर देखील ते ठाकरे यांच्याबरोबर राहिले. लोकसभा निवडणुकीसाठी ते देखील इच्छुक होते. तसा त्यांनी उमेदवारीवर दावा केला होता. मात्र, ठाकरे यांनी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित केले. यातून माजी आमदार कांबळे काहीसे नाराज होते. Loksabha Election 2024
गुरुवारी कांबळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह थेट मुंबई गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर अधिकृतपणे त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर असताना माजी आमदाराने शिंदे गटात प्रवेश केल्याने शिर्डीत ठाकरे गटाचे टेन्शन वाढले आहे. Loksabha Election 2024