मुंबई

Loksabha Election 2024 : राहुल गांधी 13 एप्रिल महाराष्ट्र दौऱ्यावर, विदर्भात जाहीर सभा

•Rahul Gandhi Will Visit Maharashtra On 13 April For Loksabha Election 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर आणि रामटेक मतदार संघासाठी आज (10 एप्रिल)सभा घेणार

मुंबई :- महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत तसतसं राजकीय रंग वाढत आहे. केंद्र नेतृत्व आपापल्या पक्षाकरिता राज्याच्या विविध लोकसभा क्षेत्रात जाहीर सभा आणि रोडशो करत आहे.राज्यातील लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात होणाऱ्या पाच लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर आता काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची 13 एप्रिल रोजी सभा होणार आहे. राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यासंदर्भात काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नेत्यांमध्ये विविध जबाबदाऱ्या वाटण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदारसंघात ही सभा होणार असल्याने त्यांच्या माध्यमातून एक समिती गठीत करण्यात आली आहे. Loksabha Election 2024

महाराष्ट्रातील पहिला टप्प्यातील पाच लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि वायनाड मधील काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी हे 13 एप्रिल रोजी विदर्भात सभा घेणार आहेत. त्यांच्या सभेची काँग्रेसच्या नेत्यांच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये गर्दी जमवण्यासाठी तसेच विविध मुद्द्यांवर काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा झाली. राहुल गांधी यांची सभा विक्रमी मतदारांच्या उपस्थितीत व्हावी, यासाठी काँग्रेसने तयारीला सुरुवात केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून नागपूर आणि रामटेक या ठिकाणी जाहीर सभा आणि रोडशो घेणार आहे. Loksabha Election 2024

आज (10 एप्रिल) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi Sabha यांचीही सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच चंद्रपूर येथे सभा पार पडली. या सभेमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर अनेक आरोप केले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज 10 एप्रिल रोजी नागपूर आणि रामटेक मतदारसंघासाठी सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर राहुल गांधी यांची सभा होणार असल्याने त्यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुल गांधी या सभेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. Loksabha Election 2024

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0