मुंबई

Loksabha Election 2024 : शेकाप आणि पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी घेतला कार्यकर्त्यांसमवेत भाजी-भाकरीचा स्वाद…!!!

पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी पिंपरी येथे दाखल करण्यात आला. या वेळी पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पनवेल, उरण व कर्जत विधानसभा मतदारसंघातून आलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसमवेत घरातून आणलेल्या भाजी, भाकरी तसेच मिरचीच्या ठेच्याच्या आस्वाद घेतला. या प्रकाराकडे उपस्थित असलेल्या सर्वांचे लक्ष वेधले गेले. Loksabha Election 2024

शेकापच्या राजकीय वर्तुळात प्रीतम म्हात्रे यांच्याकडे भविष्यातील नेतृत्व म्हणून बघितले जात आहे. पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते हे पद भूषवताना शेकापचे प्रीतम म्हात्रे यांनी सामान्य जनतेचे प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न केला. पक्षातील नव्या-जुन्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या विचारांची सांगड घालून प्रीतम म्हात्रे यांची पुढील राजकीय वाटचाल सुरू आहे. शेकापने आजवर अनेक मोर्चे, आंदोलने केली आहेत. यानिमित्त येणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांच्या नाश्ता, पाण्याची सोय केली जाते. सुकट-भाकरी, मिरचीचा ठेचा असा या वेळी बेत असतो. शेकापच्या या परंपरेची प्रचिती मंगळवारी संजोग वाघेरे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आली. Loksabha Election 2024

प्रीतम म्हात्रे यांनी मंगळवारी स्वतःच्या घरून कार्यकर्त्यांसाठी भाजी-भाकरी व मिरचीचा ठेचा आणला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झाडाच्या सावलीखाली उभे राहून प्रीतम म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांसमवेत जेवणाचा आस्वाद घेतला. हा क्षण अनुभवताना कार्यकर्ते भारावून गेले होते. Loksabha Election 2024

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0