Naygaon Police Station : नायगाव पोलिसांची मोठी कामगिरी; चोरी, गहाळ झालेले 55 मोबाईल नागरिकांना केले परत

Naygaon Police Crime Branch Latest News : हरविलेले तसेच गहाळ झालेले मोबाईल परत मिळण्याची शाश्वती कमी असताना नायगाव गुन्हे प्रकटीकरण पोलिसांनी तब्बल 55 मोबाईल पुन्हा परत मिळविण्यात यश मिळविले.
भाईंदर :- हरविलेले तसेच गहाळ झालेले मोबाईल परत मिळण्याची शाश्वती कमी असताना नायगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण Naygaon Police Station News पोलिसांनी तब्बल 55 मोबाईल पुन्हा परत मिळविण्यात यश मिळविले. संबंधित नागरिकांना हे मोबाईल पोलीस उप-आयुक्त पौणिमा चौगुले यांच्या हस्ते परत करण्यात आले. त्यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.
गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांकडून गहाळ झालेले तसेच चोरी गेलेल्या हे मोबाईल आहेत. नायगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कदम, गुन्हे निरीक्षक प्रमोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.
मोबाईल चोरी किंवा गहाळ झाल्यानंतर अनेकदा तो परत मिळेल, याची खात्री नसते. तरीही नागरिक पोलिसांकडे याची तक्रार देतात. मोबाईल हरवल्यापेक्षा त्यामधील डेटा आणि इतर माहितीमुळे नागरिक हैराण असतात. त्याचा गैरवापर होऊ नये, अशी अपेक्षा असते. नायगाव पोलिसांच्या सायबर कक्षाकडे मोबाईल चोरीला व गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या.त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक विजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे, गणेश केकान, यांच्या पथकाने हरवलेल्या मोबइलची माहिती घेण्यास सुरूवात केली होती. तांत्रिक तपास करून हरवलेले मोबाइल हे महाराष्ट्रातील विविध ठिकाणात वापरात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार मोबाईलचा आयएमईआय नंबर, लोकेशन ट्रेस करण्यासह इतर तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांनी 9 लाख 45 हजार रुपये किंमतीचे 55 मोबाइल शोधले.