Lok Sabha Election Result : राज्यात 2 आमदारांचा राजीनामा, लवकरच आणखी 4 आमदार विधानसभेचे सदस्यत्व सोडणार आहेत
Lok Sabha Election Result : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि बळवंत वानखेडे यांनी राजीनामा दिला आहे. आणखी चार आमदार लवकरच राजीनामा देणार आहेत.
मुंबई :- दोन आमदारांनी विधानसभेचे राजीनामे दिले आहेत. लवकरच आणखी चार आमदार राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे. आमदारकीतून लोकसभेसाठी उभे असलेले उमेदवार आता खासदार झाल्यानंतर संबंधित आमदारांना 20 जूनपर्यंत राजीनामा द्यावा लागणार आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि बळवंत वानखेडे यांनी राजीनामा दिला आहे.आमदार रवींद्र वायकर (शिवसेना शिंदे), आमदार वर्षा गायकवाड, आमदार प्रतिभा धानोरकर आणि मंत्री संदिपान भुमरे यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही.
कोणत्या आमदाराने कोणत्या उमेदवाराला लोकसभेत पाडले आहे
प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा क्षेत्रातून निवडून आले आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव केला आहे. बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला आहे. बळवंत वानखेडे हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून उभे होते. शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांची लढत अतिशय रोमांचक झाली होती पहिल्यांदा रवींद्र वायकर हरले होते मोजणी मध्ये रवींद्र वायकर यांचा केवळ 47 मतांनी विजयी झाला त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांचा पराभव केला आहे. अमोल कीर्तिकर हे गजानन कीर्तीकर यांचे पुत्र असून गजानन कीर्तिकर हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहे. उत्तर मध्य मुंबई येथे झालेल्या अति ताटीच्या निवडणुकीमध्ये वर्षा गायकवाड यांनी भाजपचे उमेदवार ॲड. उज्वल निकम यांचा पराभव केला आहे. अगदी शेवटच्या क्षणी वर्षा गायकवाड यांनी लीड घेत आपला विजय विजय वर नाव कोरले. दुपारी तीन वाजेपर्यंत उज्वल निकम हे आघाडीवर होते आणि तीन नंतर अचानक वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेत जवळपास 55 हजार मतांनी विजय मिळवला आहे. स्वर्गीय बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून राज्याचे कॅबिनेट मंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार यांचा तब्बल अडीच लाखावरुन अधिक मताधिक्याने पराभव केला आहे. एकनाथ शिंदे गटाचे नेते मंत्री असलेले संदिपान भुमरे यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविताना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते असलेले दोनदा खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे यांचा दारुण पराभव केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या सर्व उमेदवारांनी विजय मिळवल्याने यांना आपल्या विधानसभा सदस्य त्वचा राजीनामा द्यावे लागणार आहे आतापर्यंत काँग्रेसच्या दोन आमदारांनी आमदारकीचा राजीनामा देत काही दिवसातच खासदारकीची शपथ घेणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या विधानसभेतील जे खासदार म्हणून निवडून दिले आहे ते लवकरच आपल्या विधानसभा सदसत्वाचा राजीनामा देणार आहे.
Web Title : Lok Sabha Election Result: 2 MLAs resign in the state, soon 4 more MLAs will leave the assembly