Lok Sabha Election Live : “जय भवानी” या प्रचार गीता बाबत ठाकरे कडून करण्यात आलेल्या फेरविचार याचिका फेटाळली
Uddhav Thackeray On Election Commission : उद्धव ठाकरे गट “जय भवानी” शब्दावर ठाम, मुख्य निवडणूक आयोगाकडे दाद मागणार
मुंबई :- ‘जय भवानी’ या प्रचार गीताबाबत ठाकरे गटाकडून Thackeray Group petition दाखल करण्यात आलेला फेरविचार अर्ज फेटाळला आहे. राज्यातील केंद्रीय निवडणूक Election Commission आयोगाच्या माध्यम प्रमाणपत्र आणि देखरेख समितीने हा अर्ज फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाला आता याप्रकरणी मुख्य निवडणूक (EC) अधिकाऱ्यांकडे दाद मागावी लागणार आहे.
पक्षांना 39 नोटीस…
24 एप्रिल 2023 रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार आयोगाने धार्मिक शब्द, मजूकर वापरल्याबद्दल व इतर कारणांसाठी विविध पक्षांना 39 नोटीस जारी केल्या. यात ठाकरे गटाचाही समावेश होता. यातील 15 नोटिसांना उत्तर आले आहे. वास्तविक नोटीसमध्ये ‘जय भवानी’ शब्दाचा उल्लेख नाही. मात्र, प्रचार गीतात धार्मिक शब्दाचा उल्लेख असू नये असे स्पष्ट करण्यात आले होते. तरीही ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाने प्रचार गीतातील ‘जय भवानी’ या शब्दाला आक्षेप घेतल्याचे सांगण्यात आले होते. Maharashtra Lok Sabha Election Live
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या गीतातील हे शब्द वगळण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. ठाकरे गटाने मशाल चिन्ह मिळाल्यानंतर नवे प्रचार गीत तयार केले आहे. या प्रचार गीतामधील काही शब्द काढावे असे निवडणूक आयोगाने सांगितले असून त्यासाठी नोटीस पाठवली होती. मात्र “आम्ही जय शिवाजी जय भवानीमधील प्रचार गीतामधील जय भवानी शब्द काढावा असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. हुकुमशाहीसमोर आम्ही झुकणार नाही, प्रचार गीतामधून जय भवानी शब्द काढणार नाही”, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितले होते. Maharashtra Lok Sabha Election Live
आधी मोदींवर कारवाई करा याशिवाय “आमच्यावर कारवाई करण्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री देवाच्या नावाने मत मागतात ते चालते का? त्यांच्यावर कारवाई करा” असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. Maharashtra Lok Sabha Election Live