Lok Sabha Election 2019 Result : महाराष्ट्रात गेल्या लोकसभा निवडणुका कधी झाल्या, कोणी किती जागा जिंकल्या?
Lok Sabha Election 2019 Result : निवडणूक आयोग उद्या लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा जाहीर करणार आहे. महाराष्ट्रात मागची निवडणूक कधी झाली आणि कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या? जाणून घ्या
मुंबई :– लोकसभा निवडणूक 2024 Lok Sabha Election कधी आणि किती टप्प्यात होणार हे निवडणूक आयोग उद्या दुपारी 3 वाजता जाहीर करणार आहे. उद्या 2024 च्या निवडणुकीसाठी संपूर्ण कार्यक्रमांची यादी प्रसिद्ध केली जाईल. दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या लोकसभा निवडणुका कधी झाल्या, त्यात कोणी किती जागा जिंकल्या आणि कोणाला पराभवाला सामोरे जावे लागले याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2019 अतिशय रंजक होती. (Lok Sabha Election 2019 Result)
2019 च्या लोकसभा निवडणुका 48 जागांसाठी चार टप्प्यात पार पडल्या.
- पहिला टप्पा – 11 एप्रिल 2019 रोजी 7 जागांसाठी निवडणूक झाली.
- दुसरा टप्पा – 18 एप्रिल 2019 रोजी 10 जागांसाठी निवडणुका झाल्या.
- तिसरा टप्पा – 23 एप्रिल 2019 रोजी 14 जागांवर निवडणुका झाल्या.
- चौथा टप्पा – 29 एप्रिल 2019 रोजी 17 जागांवर निवडणुका झाल्या.
कोणत्या पक्षाची कामगिरी कशी झाली?
महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 41 जागा जिंकत भाजप आणि शिवसेना युतीचा विजय झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) 4 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला (INC) फक्त एक जागा जिंकता आली होती.
23 मे 2019 रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 23 जागा जिंकल्या, त्यानंतर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या, NCP-4, काँग्रेस-1, AIMIM-1 आणि 1 जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम उद्या जाहीर होणार आहे. 2024 च्या निवडणुका सहा किंवा सात टप्प्यांत होऊ शकतात.