मुंबई

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका

Sanjay Raut On Kolhapur Lok Sabha Election : कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांची निवड बिनविरोध व्हावी… खासदार संजय राऊत

मुंबई :- कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांची Chhatrapati Shau Maharaj निवड बिनविरोध व्हावी, अशी इच्छा होती. पण शाहूंच्या विरोधात प्रचार करून मोदी Pm Modi In Kolhapur Sabha आणि भाजपा कोल्हापुरच्या गादीचा अपमान करत आहेत अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शुक्रवारी महायुतीचे कोल्हापुरचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात येणार आहेत. यावेळी त्यांची जाहीर सभा होणार आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवार असलेले छत्रपती शाहू यांच्या विरोधात मोदी प्रचार करणार असल्याचे म्हणत राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

छत्रपती शाहूंचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहे

आज प्रसार माध्यमांशी बोलतांना संजय राऊत Sanjay Raut यांनी मोदींच्या कोल्हापूरमधील सभेवरून जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, “दलित, शोषित, पीडित यांना जीवनात ताकद देण्याचे काम शाहू महाराजांनी केले. ज्या शाहू महाराजांनी राज्याला आणि देशाला पुरोगामी विचार दिला, जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, त्या शाहूंचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान मोदी येत आहेत हे ऐकून धक्का बसला नाही, तर आश्चर्य वाटले”, अशी टीका राऊतांनी केली आहे. Maharashtra Lok Sabha Election News Live

कांद्याची निर्यातबंदी वरुन टीका

दरम्यान, मराष्ट्रात कांद्याची निर्यातबंदी कायम असताना केंद्राने गुजरातमधील दोन हजार टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिली आहे. यावरूनही राऊतांनी भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले, “निवडणुकीत गुजरातच्या व्यापाराला आणि ठेकेदाराला मालामाल करण्याचा मोदींचा डाव आहे. महाराष्ट्रात हा कांदा सडवला जातो त्याला भाव मिळत नाही. इथे कांद्यावर निर्यात बंदी केली जाते. म्हणजे गुजरातचा कांदा मोदींना प्रिय आणि महाराष्ट्राचा कांदा रस्त्यावर फेका, महाराष्ट्राचा कांदा सडवा, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची अडवणूक करा हे मोदींचं धोरण आहे” अशी टीका राऊतांनी केली आहे. Maharashtra Lok Sabha Election News Live

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला

याशिवाय शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला म्हणून ठाकरेंना पचनी पडत नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यावरही संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. “कोण शेतकऱ्याचा मुलगा? महाराष्ट्रातल्या साडेआठ कोटी शेतकऱ्यांना या शेतकऱ्याच्या मुलाप्रमाणे दोन हजार एकर जमीन द्या आणि शेतात उतरण्यासाठी पाच हेलिकॉप्टर द्या असे माझं देवेंद्र फडणवीसांना आवाहन आहे”, असा टोला राऊतांनी लगावला आहे. Maharashtra Lok Sabha Election News Live

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0