Pune Police Arrested Loan Recovery Agent : कर्जाचे हप्ते थकले म्हणून जबरदस्ती दुचाकी घेऊन एजंट पसार,मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे :- बँकेचे कर्जाचे हप्ते रिकव्हरी (Recovery Agent) करण्याकरिता बँकेकडून एक एजन्सी नेमण्यात येत आहे. या एजन्सी द्वारे बँकेचे हप्ते हे खंडणी मार्फत वसूल केल्याच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात (Pune Police Station) नोंदवण्यात आले आहे. साधारणतः रिकव्हरी एजंट हे रस्त्यातच गाडीची अडवणूक करून गाडीच्या मालकाला शिवीगाळ करून जोर जबरदस्तीने त्यांची गाडी स्वतःच्या ताब्यात घेऊन आणि हप्ता स्वतःच्या खात्यावर गुगल पे द्वारे किंवा इतर पद्धतीने जमा करण्याच्या अनेक तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात देशभरात होत आहे. अनेक वेळा रिकव्हर बाबत सर्वोच्च न्यायालयाकडून गाईडलाईन दिले असता नाही खंडणी सारखी रिकव्हरी एजंटकडून हप्ता वसूल केला जातो. पुण्यात असाच एक प्रकार समोर आला आहे. अप्पर पोलीस आयुक्त पुणे शैलेश बलकवडे यांनी लोनवर घेतलेल्या गाड्यांच्या संदर्भात सामान्य नागरिकांना रिकव्हरी एजंट कडून होत असलेल्या त्रासाच्या बाबत कारवाईच्या सूचना खंडणी विरोधी पथक 02 गुन्हे शाखा यांना दिल्या होत्या. या अनुषंगाने मार्केट यार्ड परिसरात होत असलेल्या एका नागरिकांना त्रासाबाबत पोलिसांनी कारवाई केली आहे. पीडित नागरिकाने आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज घेऊन बर्कमन ही टू व्हीलर बाईक घेतली होती. त्यांनी काही हप्ते भरले नव्हते. गाडीचे कर्जाच्या हप्ते थकवले या कारणास्त स्वतःची कोणतीही ओळख न देता जबरदस्तीने त्याच्याकडून गाडी काढून स्वतःच्या खात्यावर 37,500 खंडणी स्वरूपात पैसे घेऊन गाडी परत केले नाही या विरोधात मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये रिकव्हरी एजंट विनोद चंद्र चव्हाण (23 वर्ष,रा. बिबवेवाडी कोंढवा रोड, गंगाधाम चौक, पुणे) तक्रार देण्यात आले आहे. पोलिसांनी फिर्यादी याच्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात पोलीस ठाण्यात कलम 341,384,392,419 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Police Arrested Loan Recovery Agent
फिर्यादी याच्या तक्रारीवरून पोलिसांनी रिकव्हरी एजंट विनोद चंदन चव्हाण याला अटक केली आहे. आरोपीला पोलीस कस्टडी देण्यात आली असून आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.रिकव्हरी एंजट फायनन्स लोनचे नावाखाली बेकायदेशीररित्या गाडी घेवुन जात असल्यास व्यक्ती विरुध्द कडक कारवाई करण्यात येत असुन अशा घटना सर्व सामान्य लोकांचे बाबत होत असल्यास त्यांनी तात्काळ पोलीसांशी संपर्क करण्याचे आवाहन पुणे पोलीसा मार्फत करण्यात येत आहे. Pune Police Arrested Loan Recovery Agent
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे 2, सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, पोलीस उप निरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, दिलीप गोरे, चेतन आपटे, अमोल घावटे, अनिल कुसाळकर, चेतन चव्हाण, आजिनाथ येडे, प्रशांत शिंदे, पवन भोसले, गणेश खरात, चेतन शिरोळकर महीला पोलीस अंमलदार आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांनी कारवाई करत रिकव्हरी एजंटला अटक केली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…