ACB Trap News : तहसिलदाराची दोन लाखांच्या लाचेसाठी रंगलोली – एसीबीची धडक कारवाई

बुलढाणा प्रतिनिधी : जमिनीच्या नोंदीत बदल करण्यासाठी तब्बल दोन लाखांची लाच मागितल्याप्रकरणी मोताळा तालुक्याचे तहसिलदार हेमंत भागवत पाटील (वय ४४) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा यांनी शनिवारी सापळा रचून रंगेहात पकडले.
जमिनीच्या नोंदीसाठी लाखोंची मागणी
तक्रारदाराच्या मामाच्या नावे ग्राम थड येथील गट क्रमांक २३ मधील १.६२ हेक्टर जमीन भोगवटदार वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये नोंद करण्यासाठी तहसिलदार पाटील यांनी ₹५०,००० प्रति एकर या प्रमाणे एकूण ₹२ लाखांची मागणी केली होती.
सापळ्यात अडकलेले तहसिलदार
तक्रारदाराने तत्काळ एसीबीशी संपर्क साधताच पाटील यांना सापळ्यात ओढले गेले. शनिवारी पंचांच्या उपस्थितीत ₹२ लाख स्वीकारल्यानंतर त्यांना जेरबंद करण्यात आले.
पुरावा नष्ट करण्याचा निष्फळ प्रयत्न
स्वतःवर कारवाई झाल्याची जाणीव होताच तहसिलदार पाटील यांनी स्वीकारलेली लाच घराच्या शौचालयात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसीबीच्या अधिकाऱ्यांनी वेळेवर हस्तक्षेप करून संपूर्ण रक्कम जप्त केली.
गुन्हा दाखल व पोलीस कोठडी
या प्रकरणी पो.स्टे. बुलढाणा शहरात अप.क्र. ८०३/२०२५, कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ सह कलम २३८, ६२ भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीस अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायालयाने १७ सप्टेंबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
एसीबीचे आवाहन
भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन एसीबीने केले आहे.
📞 कार्यालय क्रमांक : ०७२६२-२४२५४८
📱 मोबाईल/व्हॉट्सअॅप : ९४०५०९१०६४
☎️ टोल फ्री क्रमांक : १०६४



