मुंबई

Sanjay Raut : स्ट्राईक रेट वक्तव्यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांचा प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा

Sanjay Raut On Prakash Ambedkar : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शिवसैनिक आता खरी शिवसेना मानतात ; वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर

मुंबई :- वंचित बहुजन VBA आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी शिवसेना उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या बद्दल स्ट्राईक रेट बद्दल केलेल्या वक्तव्यावर ठाकरे गटाकडून त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या मताचा अभ्यास केला असता एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईकरेट डबल असल्याचे म्हटले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचे शिवसैनिक आता मानत असल्याचे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. त्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि खासदार संजय राऊत Sanjay Raut यांच्याकडूनही प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी काय म्हणाले आहे

प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी म्हटले आहे की, प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहेत. त्यांनी तो वारसा चालवला पाहिजे. त्यांना शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचा वाटत असेल तर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. रामदास आठवले यांचा देखील पक्ष आहे. काही पक्ष अचानक तयार होतात आणि नंतरच्या काळात काही लोक त्यांना चालवतात, असे प्रत्युत्तर राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना दिले आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे ट्विट
प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावरून सुषमा अंधारेंनी ट्विटरवर टोला लगावला आहे. सुषमा अंधारेंनी म्हटलंय की, स्ट्राईक रेटसारखे शब्द वापरून शिवसेना पक्षाची मालकी कुणाची हे ठरत असेल तर मग आरपीआय चळवळीचा एकमेव माणूस सातत्याने खासदार आणि मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या वतीने दिल्लीच्या राजकारणात आहे. याचा अर्थ नेतृत्व फक्त आणि फक्त आठवले साहेबच करू शकतात, असा टोला सुषमा अंधारेंनी प्रकाश आंबेडकरांना लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0