मुंबई
Trending
Vijay Wadettiwar : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष पदावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका
•नियमाला डावलून नियुक्ती ; विरोधी पक्षाचा आरोप
मुंबई :- महाराष्ट्र नियंत्रण प्रदूषण मंडळाचे MPCB अध्यक्षपदी माजी मंत्री रामदास कदम Ramdas Kadam यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी टीका केली असून ते म्हणाले की, हे नियुक्ती नियमाला डावलून केल्याचा आरोप केला आहे.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
- निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील नाराज नेत्यांच्या मुलांना खुश ठेवण्यासाठी “लॉलीपॉप” वाटप!
- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी रामदास कदम यांचे सुपुत्र सिद्धेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- नियम डावलून ही नियुक्ती करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
- जागा वाटपावरून गेले काही दिवस रामदास कदम भाजपवर टीका करत आहे आणि आता त्यांच्या मुलाची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून लॉलीपॉप देण्याचा हा प्रयत्न दिसत आहे.
- लोकसभा जागांच्या बदल्यात भाजप – शिंदे आणि अजित पवार गटातील नाराज नेत्यांना सरकारी पद वाटून सेटलमेंट करण्यासाठी ही शासकीय पदे आहे का ?