Nalasopara Crime News : नालासोपारा ‘दृश्यम’ हत्याकांडाचा उलगडा! पतीचा खून करून घरातच पुरले,

Nalasopara Crime News : प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची क्रूर हत्या; पुरावा मिटवण्यासाठी देवरकडून लावून घेतल्या फरशा
नालासोपार :- ‘दृश्यम’ चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल अशा एका धक्कादायक हत्याकांडाचा नालासोपारा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नालासोपारा पूर्वेकडील गंगडीपाडा येथील साई वेल्फेअर सोसायटीत आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून मृतदेह घरातच पुरणाऱ्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला पुणे येथून अटक करण्यात आली आहे. तब्बल 10 ते 15 दिवसांपूर्वी घडलेल्या या थरारक घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. Nalasopara Crime News
मिळालेल्या माहितीनुसार, मृत विजय चौहान याची पत्नी गुडियाचे मोनू नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात पती विजय अडसर ठरत असल्याने, पत्नी गुडिया आणि तिचा प्रियकर मोनू यांनी मिळून विजयच्या हत्येचा कट रचला. सुमारे 10 ते 15 दिवसांपूर्वी त्यांनी या कटाची अंमलबजानी करत विजयची क्रूरपणे हत्या केली. एवढेच नाही, तर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी विजयचा मृतदेह घरातच खड्डा खोदून पुरला.
या घटनेची कुणालाही माहिती होऊ नये म्हणून आरोपी पत्नीने अक्षरशः ‘दृश्यम’ चित्रपटाप्रमाणेच नियोजन केले. तिने आपल्याच देवरला बोलावून मृतदेह पुरलेल्या ठिकाणी नवीन फरशा (टाईल्स) लावून घेतल्या, जेणेकरून कुणालाही संशय येऊ नये. पती बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी विजयबद्दल विचारणा केली असता, गुडिया त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करत होती.
अखेरीस, अनेक दिवस उलटल्यानंतर घरातून तीव्र दुर्गंधी येऊ लागली. कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी त्यांना दुर्गंधीचे कारण लक्षात आले. तात्काळ जमिनीची खोदणी केली असता, त्यात विजय चौहानचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात एकच हाहाकार उडाला.
अखेरीस, अनेक दिवस उलटल्यानंतर घरातून तीव्र दुर्गंधी येऊ लागली. कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी त्यांना दुर्गंधीचे कारण लक्षात आले. तात्काळ जमिनीची खोदणी केली असता, त्यात विजय चौहानचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात एकच हाहाकार उडाला.
घटनेची माहिती मिळताच, नालासोपारा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आपल्या कौशल्याने पोलिसांनी आरोपी पत्नी गुडिया आणि तिचा प्रियकर मोनू यांना पुणे येथून शोधून काढले आणि अटक केली. त्यांना आता नालासोपारा येथील पेल्हार पोलीस ठाण्यात Pelhar Police Station आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे नालासोपारा परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे आणि संतापाचे वातावरण आहे.



