Laxman Hake Protest | लक्ष्मण हाके यांचं गिरगाव चौपाटीवर जलसमाधी आंदोलन, ओबीसी नेत्यांचा सरकारला इशारा

Laxman Hake Protest | अजित पवारांना लक्ष्य करत उपमुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी
मुंबई | राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून आधीच वातावरण तापलेलं असताना, आता ओबीसी समाजातही संतापाचा नवा झोत उसळला आहे. Laxman Hake Protest ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी महाज्योती योजनेच्या निधीअभावी ओबीसी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात गिरगाव चौपाटीवर जलसमाधी आंदोलन छेडून सरकारला थेट इशारा दिला.
“उठ ओबीसी जागा हो, संघर्षाचा धागा हो!” अशा घोषणांनी चौपाटीचा परिसर अक्षरशः हादरवून सोडला. हाके यांच्यासोबत विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनीही समुद्रात उतरून संताप व्यक्त केला. आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि लक्ष्मण हाके यांच्यासह त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतले.
हाके यांनी सरकारवर निशाणा साधताना म्हटलं की, सारथी आणि बार्टीसाठी कोट्यवधी रुपये मंजूर होतात, पण मागील तीन वर्षांपासून महाज्योती योजनेस सातत्याने डावललं जात आहे. यामुळे हजारो ओबीसी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारात गेलं असून, हे दुर्लक्ष हेतुपुरस्सर आहे, असा आरोप त्यांनी केला.
इतकंच नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट तोफ डागत, हाके म्हणाले की, “जर त्यांना अर्थखात्याची जबाबदारी पार पाडता येत नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि माळेगाव तालुक्यापुरतं मर्यादित राहावं.” त्यांनी पवार कुटुंबावरही टीकास्त्र सोडत सत्तेच्या राजकारणाचा खरपूस समाचार घेतला.


