महाराष्ट्रविशेष
Trending

Lata Mangeshkar Birthday : भारतरत्न स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस

Lata Mangeshkar Birthday Happy Birthday Lata Didi : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी त्यांना आदरांजली वाहिली

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांनी शनिवारी दिग्गज पार्श्वगायिका स्वर कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर Lata Mangeshkar Birthday यांना त्यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आणि त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या “विशेष सहवासाची” आठवण केली. पंतप्रधान मोदींनी ‘X’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “लता दीदींना त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण. दीदींच्या मधुर गाण्यांमुळे त्या लोकांच्या हृदयात आणि मनात कायम जिवंत राहील. Lata Mangeshkar Birthday

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “लता दीदी आणि माझा विशेष संबंध होता. त्यांचे स्नेह आणि आशीर्वाद घेण्याचे भाग्य मला लाभले.” पंतप्रधानांनी लता मंगेशकर यांचे बंधू आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी ‘एका वृत्तपत्रामधील लिहिलेला लेखही शेअर केला ज्यामध्ये मोदी आणि दिग्गज गायक यांच्यातील संबंधांचा उल्लेख आहे. Lata Mangeshkar Birthday

भारतीय संगीत विश्वातील अतिशय मौल्यवान आवाज असलेल्या लता मंगेशकर यांची 28 सप्टेंबर रोजी जयंती आहे. त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर येथील प्रसिद्ध संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी झाला.प्रसिद्ध गायकाची तरुण वयातच गाण्यांशी मैत्री झाली. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी गायला सुरुवात केली. लता मंगेशकर यांची गाणी 80-90 च्या दशकातील असतील, पण तरीही ती लोकांना भुरळ घालतात. Lata Mangeshkar Birthday

ए मेरे वतन के लोगो…

लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीतील सर्वात प्रसिद्ध गाणे ‘ये मेरे वतन के लोगों, जरा आंख में भर लो पानी’ हे गाणे आजही लोकांच्या डोळ्यात पाणी आणते. हे गाणे म्हणताना गायिका लता मंगेशकर रडल्या. या गाण्याशी निगडीत एक प्रसंग आहे.साठच्या दशकात जेव्हा चीनने भारतावर हल्ला केला तेव्हा देश एकप्रकारे अघोषित युद्धाला तोंड देत होता. सीमेवर जवान शहीद होत होते. त्यावेळी लता मंगेशकर यांनी त्यांच्या आठवणीत हे गाणे गायले होते.

याशिवाय “आप की नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे’, ‘ये जिंदगी उसी की है, जो किसी का हो गया’, ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मैं’, ‘पंछी बनू उड़ती फिरू मस्त में’ ‘आ जा आई बहार, दिल है बेकरार’ 1980 ते 2016 पर्यंत सदाबहार गाणे लता मंगेशकर यांनी भारतासह जगाला आणि संगीत विश्वाला दिले आहे. मोहम्मद रफी, अमिताभ बच्चन, किशोर कुमार, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान यांसारख्या दिग्गज सिने कलाकारांसोबत लता मंगेशकर यांनी काम केले आहे. लतादीदींचे अविस्मरणीय गाणे भारतासह जगासमोर कायम स्मरणात राहील अशा दीदीला महाराष्ट्र मिरर कडूनही आदरांजली..!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0