Badlapur Crime News : बदलापूर एन्काऊंटर प्रकरणावर पडदा! न्या. दिलीप भोसले आयोगाकडून गोळीबार करणाऱ्या पोलिसांना ‘क्लीनचीट’

Badlapur Latest News : पोलिसांचा ‘स्वसंरक्षणासाठी गोळीबार’ करण्याचा दावा आयोगाने ग्राह्य धरला; पोलिसांना कायदेशीर दिलासा.
मुंबई :- ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील अल्पवयीन शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर Akshay Shinde Encounter प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्या. दिलीप भोसले न्यायालयीन आयोगाने आज मोठा निकाल दिला आहे. आयोगाने एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या ‘स्वसंरक्षणासाठी गोळीबार’ करण्याच्या दाव्याला ग्राह्य धरत त्यांना निर्दोषत्व बहाल केले आहे. Badlapur Breaking News
पोलिसांना कायदेशीर दिलासा
23 सप्टेंबर 2024 रोजी अक्षय शिंदे याचा तळोजा तुरुंगात नेत असताना पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. हा एन्काऊंटर बनावट असल्याचा आरोप करत या प्रकरणावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने एसआयटी स्थापन करून चौकशीचे आदेश दिले होते, तर सर्वोच्च न्यायालयाने डीजीपींना एसआयटी स्थापन करण्याची सूचना केली होती.
आता न्या. दिलीप भोसले आयोगाने पोलिसांना क्लीनचीट दिल्याने या वादग्रस्त प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार न केल्यामुळे राज्य मानवाधिकार आयोगानेही पोलिसांना क्लीनचीट दिली होती.
व्हॅन प्रक्रियेवर आयोगाचा सवाल
गोळीबार स्वसंरक्षणासाठी झाल्याचा दावा आयोगाने मान्य केला असला तरी, आयोगाने आरोपीला पोलिसांच्या व्हॅनमधून नेण्याच्या प्रक्रियेवर मात्र काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आयोगाला या प्रक्रियेत काही त्रुटी आढळल्याचे संकेत मिळत आहेत.
यापूर्वी उच्च न्यायालयाने या प्रकरणी पाच पोलिसांना जबाबदार धरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता आयोगाने ‘क्लीनचीट’ दिल्याने पोलिसांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे.


