Lalbhaug Cha Raja Visarjan Update : भरगर्दीचा फायदा घेत मोबाईल, सोन्याच्या साखळ्यांची चोरी; पोलिसांकडून चार चोरट्यांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त
मुंबई :- मुंबईतील सर्वात लोकप्रिय गणपती मंडळ म्हणून ओळख असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदा तब्बल 35 तासांचा वेळ लागला. या विसर्जन सोहळ्यात लाखोंच्या संख्येने भाविक गर्दी करतात. हीच गर्दी पाहून मोबाईल चोर आणि सोनसाखळी चोरट्यांनी आपला डाव साधल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर जमलेल्या भाविकांचे 100 हून अधिक मोबाईल फोन चोरीला गेले आहेत. या संदर्भात काळाचौकी पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार मोबाईल चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
याशिवाय, सोनसाखळी चोरीच्या अनेक तक्रारीही पोलिसांकडे आल्या आहेत. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेक महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून घेतल्या. या प्रकरणात पोलिसांनी 12 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन सोन्याच्या साखळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
या भुरट्या चोरांच्या टोळ्या विसर्जन मिरवणुकीत सामील झाल्या होत्या. त्यांनी गर्दीचा गैरफायदा घेत ही चोरी केली, असे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच, मुंबई पोलिसांच्या भोईवाडा पोलीस ठाण्यात परवानगी नसताना ड्रोन वापरल्याबद्दलही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनांमुळे विसर्जन सोहळ्याच्या उत्साहाला गालबोट लागले आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…