Mumbai Lalbhaug Cha Raja Visarjan 2025 : 12 वाजता निघालेली मिरवणूक 33 तासांनी पूर्ण; सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा मंडळावर रोष, ‘राजाचा प्रसाद’ म्हणत केली खोचक टीका
मुंबई :- गणेशभक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला लालबागचा राजा यंदा विसर्जन मिरवणुकीत 33 तास थांबल्यामुळे चर्चेत आला आहे. Lalbhaug Cha Raja Visarjan 2025 शनिवारी दुपारी 12 वाजता निघालेल्या या मिरवणुकीचा शेवट रविवारी रात्री 9.10 वाजता झाला, त्यामुळे मंडळाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीमुळे मूर्ती अत्याधुनिक तराफ्यावर चढवताना अडथळे आल्याने हा विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शनिवारी दुपारी मोठ्या उत्साहात लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली. ही मिरवणूक गिरगाव चौपाटीवर रविवारी सकाळी साडेसात वाजता पोहोचली. मात्र, यावेळी समुद्राला मोठी भरती असल्यामुळे मूर्ती ट्रॉलीवरून अत्याधुनिक तराफ्यावर चढवता आली नाही. त्यामुळे मूर्ती किनारीच थांबून राहिली. अखेर, दुपारी भरती ओसरल्यानंतर कोळी बांधवांच्या मदतीने सायंकाळी साडेसहा वाजता मूर्ती तराफ्यावर चढवण्यात यश आले आणि रात्री 9.10 वाजता राजाचे विसर्जन करण्यात आले.
या विलंबामुळे सोशल मीडियावर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. काही नेटकऱ्यांनी ‘साधा पाऊस आला तर रस्ता खराब होतो, मग समुद्रातील भरतीचा अंदाज मंडळाला का आला नाही?’ असे प्रश्न विचारले. तर, काहींनी मंडळाच्या व्यवस्थापनावर ताशेरे ओढले. ‘सामान्य भक्तांना तासन्तास रांगेत उभे ठेवणाऱ्या आणि व्हीआयपींसाठी पायघड्या घालणाऱ्या मंडळाला खुद्द राजानेच चौपाटीवर ताटकळत ठेवले’, अशी खोचक टीकाही अनेकांनी केली. या विलंबामुळे गणेशभक्तांमध्ये मात्र नाराजी दिसून आली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…